शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

शेकापचा बुरूज ढासळला

By admin | Published: May 27, 2017 2:57 AM

पनवेल महापालिका स्थापन करण्याचा १९९१ पासूनचा प्रलंबित प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडविला. सहा महिन्यांत २५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

नामदेव मोरे। लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका स्थापन करण्याचा १९९१ पासूनचा प्रलंबित प्रश्न भारतीय जनता पार्टीने सोडविला. सहा महिन्यांत २५० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. महापालिकेमुळे विकासातील अडसर दूर झाल्याची खात्री पटल्याने पनवेलकरांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये भाजपाला एकहाती सत्ता देऊन त्यांच्यावर विश्वास दाखविला. भाजपाच्या वादळामध्ये सर्वपक्षीयांची दाणादाण उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निर्मितीसाठी भाजपा आ. प्रशांत ठाकूर आग्रही होते. १ आॅक्टोबरला महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर सहा महिन्यांत सरकारने विकासासाठी भरघोस निधीही दिला. शेतकरी कामगार पक्ष,राष्ट्रवादी व काँगे्रसने पंचायत समिती व जिल्हा परिषदेमधील आघाडी महापालिकेसाठीही कायम ठेवली. शिवसेनेची ताकद अत्यंत अल्प असली तरी भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी युती करण्याऐवजी स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रशांत व रामशेठ ठाकूर स्वार्थासाठी पाच वर्षांनी पक्ष बदलत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. नगरपालिकेच्या कारभारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप होता. काँगे्रस व राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पनवेलमध्ये तळ ठोकून होते. परंतु मतदारांनी शेकाप आघाडीसह सेनेला स्पष्ट नाकारले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सभा घेऊन तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही विकास देतो. पनवेलकरांना मंत्रिपद देण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनही त्यांनी दिले. भाजपाने विरोधकांवर टीका करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवित ५१ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता मिळविली आहे. मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक दृष्टिकोन व रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्या कुशल नेतृत्वामुळे सर्वच विरोधकांना कात्रजचा घाट दाखविण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे. पनवेल महापालिकेचा प्रवास४ सप्टेंबर १९९१ - महापालिका स्थापण्यासाठी शासनाने अभिप्राय मागविला.२४ सप्टेंबर १९९१ - शासनाने महापालिकेच्या स्थापनेसाठी प्राथमिक अधिसूचना मागविली.१० सप्टेंबर २००१ - दहा वर्षांनंतर महापालिका घोषित करण्याऐवजी नगरपालिकेला अ वर्ग दर्जा दिला.२४ जुलै २००६ - खारघर, कामोठे, कळंबोली नोड नवी मुंबई महापालिकेत समावेशासाठी शासनाने अभिप्राय मागितले.१२ फेब्रुवारी २००७ - नगरपालिकेने नवी मुंबईला विरोध करून, स्वतंत्र महापालिकेची मागणी केली. २३ नोव्हेंबर २०१५ - शासनाने पनवेल महापालिका करण्याची घोषणा केली.१७ डिसेंबर २०१५ - महापालिका करण्यासाठी नगरपालिकेने ठराव केला.६ मे २०१६ - शासनाच्या अभ्यास समितीने अहवाल सादर केला.१६ मे २०१६ - महापालिकेसाठी अधिसूचना काढली. १ आॅक्टोबर २०१६ - पनवेल महापालिका अस्तित्वात.१९ एप्रिल २०१७ - निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर.२६ मे २०१७ - पहिल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे यश नकारात्मक प्रचारामुळेच अपयश शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस, राष्ट्रवादी व शिवसेनेने भाजपावर टीका करण्यावर सर्वाधिक लक्ष दिले. पनवेलच्या विकासापेक्षा ठाकूर पिता -पुत्रांच्या पक्षांतरावर, कार्यशैलीवर टीका करण्यावर भर दिला. दुसरीकडे भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. प्रशांत ठाकूर यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली व नागरिकांचा विश्वास संपादन करून एकहाती सत्ता मिळविली. नकारात्मक प्रचारामुळेच विरोधकांना नामुश्कीजनक पराभवास सामोरे जावे लागले.