शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

“पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार”; जयंत पाटलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 1:33 PM

Jayant Patil News: केंद्रातील एनडीए सरकार कोसळण्याबाबत महाविकास आघाडीकडून आणखी एक दावा करण्यात आला आहे.

Jayant Patil News: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू केला. परंतु, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासूनच एनडीए सरकार कोसळण्याबाबत दावे केले जात आहेत. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आता याबाबत मोठा दावा केला आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांपर्यंत विरोधकांनी हे एनडीए सरकार अधिक काळ टिकणार नाही, असे सातत्याने म्हटले आहे. यातच एका कार्यक्रमात बोलताना शेकाप नेते जयंत पाटील यांनी ढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार असल्याचा मोठा दावा केला आहे. अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा केला होता.

केंद्रात सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार

पुढील चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलणार आहे. त्यानंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत जातील. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचा अनेक वर्षांचा कार्यकाळ दिल्लीत घालवलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. मीही इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे. त्यामुळे हे सांगत आहे, असे शेकापच्या जयंत पाटील यांनी म्हटले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी याबाबत विधान केले होते. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला, अल्पमतात आहेत. बहुमत गमावले. त्यांच्याकडे बहुमत नाही. कुबड्यावरचे सरकार आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर त्यांचे  सरकार कधीही कोसळेल. जे म्हणतात मोदी जिंकले त्यांच्या बडबडण्यावर मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, या शब्दांत संजय राऊतांनी टीका केली. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीJayant Patilजयंत पाटील