अझहर शेख / आॅनलाइन लोकमत, नाशिक : जगाच्या पाठीवरून अन्नसाखळीमधील महत्त्वाचा असलेला घटक गिधाड नामशेष होत असून संरक्षित पक्ष्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होत आहे. गिधाड हा निसर्गाचा सफाईकामगार म्हणून ओळखला जातो. गिधाडच्या प्रजाती भारतातही धोक्यात आल्या आहेत; मात्र नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ह्यखोरीपाडा येथे आदिवासी मागील सहा वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले असून दोन्ही प्रजातींच्या गिधाडांच्या संख्येत शेकडोने वाढ झाली आहे.गिधाड संवर्धन ही काळाची गरज ओळखून वनविभागाने येथील गावकºयांशी चर्चा करून तत्काळ संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी जागेची पाहणी करुन संरक्षक कुंपण तयार केले आणि त्याला ह्यगिधाड रेस्तरॉँह्ण असे नाव देण्यात आले. हा रेस्तरॉँ चालविण्याची संकल्पनाही अत्यंच आगळीवेगळी अधिकाºयांनी आणि गावकºयांनी शोधून काढली.सरकारी इच्छाशक्ती असेल आणि त्या इच्छाशक्तीनुसार केलेल्या प्रयत्नांना जर लोकसहभागाची जोड मिळाली, तर निसर्गाचे संवर्धन कशा पध्दतीने होऊ शकते, याचे मुर्तिमंत उदाहरण खोरीपाड्याला भेट दिल्यावर सहज पहावयास मिळते.
वनविभाग व अदिवासी आशावादीप्रारंभी वर्षभर या प्रकल्पाकडे गिधाडे अगदी बोटावर मोजण्याइतकेच आली; मात्र प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळाल्याचे बघून वनविभाग व गावकरी आशावादी होते. त्यांनी ह्य रेस्तरॉ सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न कमी पडू दिले नाही. पंचक्रोषित कुठेही जनावर दगावले तर ते जनावर रेस्तरॉँ पर्यंत आणून गिधाडांना खाद्य उपलब्ध करुन दिले. त्यामुळे गिधाडांना रेस्तरॉँ चांगलाच भावला हळहळू गिधाडे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आले. तीन वर्षांमध्ये गिधाडांची संख्या तीनशेपर्यंत पोहचल्याने प्रकल्पाला यश आल्याने समाधान व्यक्त केले गेले.