शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रभाग अधिकाऱ्यावर शाईफेक!

By admin | Published: December 24, 2016 4:52 AM

शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे

कल्याण : शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याच्या रागातून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी ११ वाजता शाई फेकण्यात आली. श्यामराव क्षीरसागर यांनी शाई फेकली असून, ते ठाणे जिल्हा शिवसेना कर्मचारी सेनेचे संस्थापक अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत. या प्रकाराबद्दल त्यांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या घटनेचा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या महापालिकेतील संघटनेने निषेध करीत कामबंद आंदोलन छेडले. त्यामुळे दुपारी दोननंतर कोणतेही कामकाज झाले नाही. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या क्षीरसागर यांच्या शिव वडापावच्या गाडीवर ‘क’ प्रभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान गाडीवर असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाक रे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा तोडल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे. त्याचा निषेध म्हणून शाईफेक केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शुक्रवारी निवेदन देण्याच्या बहाण्याने ‘क’ प्रभाग कार्यालयात आलेल्या क्षीरसागर यांनी वानखेडे यांच्यावर शाईफेक करताच त्यांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोंडून बेदम मारहाणही केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांसमोरही हा मारहाणीचा प्रकार सुरू होता. वानखेडे यांनी क्षीरसागरांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)