शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला

By admin | Published: March 07, 2017 3:25 AM

तब्बल २५ वर्षांनंतर एकहाती सत्ता संपादित केल्याने सोमवारी ठाण्यात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसले.

ठाणे : तब्बल २५ वर्षांनंतर एकहाती सत्ता संपादित केल्याने सोमवारी ठाण्यात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसले. यामुळे त्यांनी संपूर्ण ठाण्याचे वातावरण भगवे करून टाकले होते. महापालिका मुख्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, प्रवेशद्वारावर स्वागतासाठी दोन हत्ती ठेवून परिसर केवळ जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद... अशा घोषणा अन् फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोलताशांच्या गजराने दणाणून सोडला होता. सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक होती. अपेक्षेप्रमाणे एकहाती सत्ता संपादित करणाऱ्या शिवसेनेचाच महापौर होईल, हे स्पष्ट होते. त्यामुळेच आदल्या दिवसापासून महापालिका मुख्यालयाच्या आवाराचे वातावरण भगवे होण्यास सुरुवात झाली होती. गुरुकुल सोसायटी, नितीन कंपनी, पाचपाखाडी परिसर आदींसह आजूबाजूचा परिसरदेखील भगवा झाला होता. या वेळी भगवे कंदील आकर्षणाचे केंद्र ठरले होते. भगवे झेंडे, झालरी यामुळे वातावरण अवघे शिवसेनामय झाले होते. मोठमोठ्या रांगोळ््या काढल्या होत्या. महापालिका मुख्यालयाच्या आवारात भव्य हत्ती सर्वांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होते. मुख्यालयात प्रवेश करताच आत भला मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुख्य आकर्षण ठरला होता. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अनेकांनी या ठिकाणी सेल्फी काढून घेतले होते. त्यानंतर, महापौरपदाच्या निवडणुकीतदेखील सभागृहात शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान केले होते. महापौरपदाच्या निवडणूक प्रसंगी सभागृहात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लावलेली सहकुटुंब उपस्थिती सर्वांचेच आकर्षण ठरली होती. ठाकरे यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर तमाम ठाणेकरांचे आभार मानले. यानंतर निघालेली मिरवणूकही अगदी शाही होती. ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वातावरण भगवे झाले होते. नितीन कंपनी ते महापालिका मुख्यालयापर्यंत भगवे झेंडे, कंदील यामुळे या भागात वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी) >गुलालाची झाली उधळणमहापौरपदाची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनापक्षप्रमुखांच्या उपस्थितीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी गुलाल उधळून विजयी जल्लोष साजरा केला. ही मिरवणूक महापालिका भवन, अरुणकुमार वैद्य, आराधना सिनेमा, हरिनिवास सर्कल, मल्हार चौक, गोखले रोड, राममारुती रोड, तलावपाळी, प्रभात चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून टेंभीनाका येथे विसर्जित करण्यात आली.