शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

शिखर बँक घोटाळा : ...तर मला आश्चर्य वाटले असते; ईडीच्या नोटिशीवरून शरद पवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:07 PM

माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो. 

ठळक मुद्देज्या संस्थेच्या मी सभासद देखील नाही आणि संस्थेने घेतलेल्या निर्णयात माझा सहभाग नसल्याचं पुढे शरद पवार यांनी सांगितले.माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. तक्रार करणाऱ्याने केलेली तक्रार कर्ज संबंधी होती. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे.

मुंबई - शिखर बँकेतील 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. 

मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. 

ज्या संस्थेचा मी सभासद देखील नाही आणि संस्थेने घेतलेल्या निर्णयात माझा सहभाग नाही अशा प्रकरणात माझे नाव आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मला अद्याप नोटीस मिळालेली नाही. माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागत करतो. राज्यातील कोणत्याही बँकेचा मी संचालक नव्हतो. कधीही मी संचालक पदासाठी निवडणूक लढवली नाही, तरीही गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच या कारवाईवर उपहासात्मक टीकाही केली.

तक्रार करणाऱ्याने केलेली तक्रार कर्ज संबंधी होती. हा त्या गृहस्थाच्या तक्रारीचा भाग आहे. असे असताना माझ्यावर केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असेल, मग ती ईडी असेल, राज्य सरकारची तपास यंत्रणा असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो, असेही पवार म्हणाले. राज्यामध्ये सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर त्या संस्थांना बाहेर काढण्यासाठी त्याना मदत करण्याचे काम बँकांचे असते आणि मदत करतात. ही मदत करणे हा काही गुन्हा नाही. मात्र, राज्य बँक बुडाल्याचे वाईट वाटते असे पवार म्हणाले.

उपरोधिक टीकामहाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांत गेलो तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तरुणाईची मोठी उपस्थिती होती. या पार्श्वभुमीवर माझ्यावर कारवाई झाली नसती तर मला आश्चर्य वाटले असते. त्यामुळे या कारवाईचे काही वाटत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयbankबँक