शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिखर बँकेच्या ‘तपास बंद’ अहवालाला आव्हान, मुख्य तक्रारदारासह पारनेर कारखाना बचाव समितीकडून याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 6:26 AM

मागील वर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशाने बँकेच्या ७६ संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. सर्वोच्च न्यायालयानेही हा गुन्हा रद्द करण्याची संचालकांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता.

अहमदनगर - राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) ७६ संचालकांवर दाखल झालेल्या आर्थिक अपहार व फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी सादर केलेल्या तपास बंद (क्लोजर रिपार्ट) अहवालाला मुंबईच्या सिटी सिव्हिल सेशन स्पेशल कोर्टात मुख्य तक्रारदारांसह पारनेर साखर कारखाना बचाव समिती, अशा चार जणांनी वेगवेगळ्या प्रोस्टेस्ट पिटिशन (हस्तक्षेप याचिका) दाखल करीत आव्हान दिले आहे. या प्रकरणात राज्यातील बडे राजकीय नेते आरोपी आहेत.मागील वर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशाने बँकेच्या  ७६ संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. सर्वोच्च न्यायालयानेही हा गुन्हा रद्द करण्याची संचालकांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने केला होता. वर्षभराच्या तपासानंतर गेल्या महिन्यात न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. बँकेच्या सर्व संचालकांना दोषमुक्त करीत या तक्रारीत फार तथ्य नसल्यामुळे या गुन्ह्याचा तपास बंद करावा, असे या अहवालात म्हटले आहे. याबाबत मात्र मुख्य तक्रारदार व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव जाधव व याचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांच्यासह शालिनीताई पाटील, बबनराव कवाद यांनी या तपास बंद अहवालाला मुंबई येथील सिटी सिव्हिल सेशन कोर्टात आव्हान दिले आहे. हा तपास मान्य नाही, तपास राज्याच्या पोलीस यंत्रणेकडून काढून ईडी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी त्यांनी या हस्तक्षेप याचिकेद्वारे केली आहे. दरम्यान, सक्त वसुली संचालनालयानेही यापूर्वीच या अहवालावर आक्षेप घेऊन तपास आमच्याकडे वर्ग करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे. याप्रकरणी ६ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय