शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
2
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
3
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
4
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
6
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
7
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
9
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
10
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
11
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
12
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
13
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
14
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
15
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
17
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
18
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
19
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा जल्लोष

By admin | Published: February 05, 2015 1:36 AM

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत देवाच्या जयघोषात बुधवारी देवभेट उरकली.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त मानाच्या शिखरी काठ्यांनी भंडार-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत देवाच्या जयघोषात बुधवारी देवभेट उरकली. संपूर्ण गडकोट ‘सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने दुमदुमला नि पिवळ्या धम्मक भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता. शिखरी काठ्यांच्या देवभेटीने यात्रेची सांगता झाली.सकाळी ९ वाजता संगमनेरकर होलम राजाच्या मानाच्या शिखर काठीने मुक्काम स्थळावर स.पो.नि. रामदास शेळके यांच्या हस्ते समाज आरती केल्यानंतर गडाकडे कूच केले. ऐतिहासिक छत्री मंदिर, होळकरांचा मान घेऊन मारुती मंदिरमार्गे महाद्वार पथावरून प्रासादिक शिखरी काठ्यासह मानाची ही काठी वाजतगाजत ११ वाजून ४५ मिनिटांनी गडावर पोहोचली. या वेळी संगमनेरहून आलेल्या सुमारे २० हजार भाविकांनी देवाचा जयघोष करीत भंडार-खोबऱ्याची उधळण केली. याच जयघोषात काठीने गडकोटातील मुख्य मंदिराच्या शिखराला स्पर्श करून देवभेट घेतली.दुपारी साडेबारा वाजता सुपेकर खैरे यांच्या शिखर काठीने सातभाई वाड्यातून गडाकडे कूच केले. छत्री मंदिर, तसेच होळकरांचा मान स्वीकारून मारुती मंदिरामार्गे महाद्वार पथावरून वाजतगाजत मिरवणुकीने गडाकडे निघाली. सोबत स्थानिक होळकरांची शिखर काठी होतीच. मानाच्या या दोन्ही शिखरी काठ्यांसमवेत इतरही प्रासादिक काठ्या दुपारी दीडला गडावर पोहोचल्या. याही वेळी देवाचा जयघोष आणि भंडार-खोबऱ्याच्या उधळणीत काठ्यांची देवभेट झाली.च्संगमनेरकर होलम, सुपेकर खैरे, आणि स्थानिक होळकर या मानाच्या ३ शिखरी काठ्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर ५०हून अधिक प्रासादिक शिखरी काठ्या कुलदैवताची माघ पौर्णिमेला वर्षातून एकदा देवभेट घेतात.