सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे जयसिद्धेश्वर व वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ३५ लाखांचा खर्च कमी दाखविला आहे. निवडणूक खर्च निरीक्षक अभय गुप्ता यांनी या तिन्ही उमेदवारांना नोटिसा दिल्या आहेत. या नोटिसीला तिन्ही उमेदवार रविवारी लेखी खुलासा करणार आहेत. त्यामुळे भरारी पथकाने जप्त केलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपयांची रक्कम संबंधितांना परत देण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते ३ एप्रिलपर्यंत झालेल्या खर्चाची माहिती उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या खर्च विभागास दिली आहे. यात सुशीलकुमार श्ोिंदे यांनी ३ लाख ६0 हजारांचा खर्च झाल्याचे सांगितले आहे. जयसिद्धेश्वर यांनी ३ लाख ५६ हजार तर प्रकाश आंबेडकर यांनी १ लाख २६ हजार खर्च झाल्याची माहिती दिली आहे.उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चावर नजर ठेवण्यास विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून उमेदवाराने रोज केलेल्या खर्चाची माहिती निवडणूक कार्यालयातील रजिस्टरला घेतली जाते. या रजिस्टरनुसार शिंदे यांच्या खर्चात १४ लाख ९७ हजारांचा, जयसिद्धेश्वर यांच्या खर्चात १0 लाख ४0 हजार तर आंबेडकर यांच्या खर्चात ९ लाख ९६ हजारांचा खर्च कमी दाखविण्यात आला आहे. त्यामुळे तिघांना नोटीस पाठवून तफावतीविषयी विचारणा केली आहे.लाखो रुपये जप्तसांगोला तालुक्यात ७ लाख ३५ हजारांची रक्कम भरारी पथकाने जप्त केली होती. याशिवाय अन्य एका ठिकाणी २ लाख ९८ हजार ताब्यात घेण्यात आले होते. ही सर्व रक्कम वैध असल्याने ही रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश खर्च विभागाने दिले. मोहोळ तालुक्यात जप्त केलेल्या २३ लाख ५0 हजारांच्या रकमेबाबत लवकरच सुनावणी घेऊन याबाबत समिती निर्णय घेईल, अशी माहिती खर्च नियंत्रण विभागाचे समन्वय अधिकारी तथा जि.प.मुख्य व लेखा अधिकारी महेश आवताडे यांनी दिली.श्रीगोंदा येथे सात लाख जप्तनगर-दौंड रस्त्यावर चिखली घाट येथे ६ लाख ९८ हजार ५०० रूपयांची तर हिरडगाव फाटा येथे १ लाख, अशी ७ लाख ९८ हजार ५०० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. तपासणी पथकाने ही रक्कम पथकाने ताब्यात घेतली आहे. दोन्ही घटनांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे.