छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक पावले टाकणारा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी काढला. त्यानुसार न्या. संदीप शिंदे समितीची कार्यकक्षा अणि व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली आहे.
जीआर घेऊन मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ शनिवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला रुग्णालयात आले. जीआरचे वाचन झाल्यानंतर आरक्षणासाठी २४ डिसेंबर हीच अंतिम मुदत आहे. २ जानेवारीपर्यंत सरकारला वेळ देणार नाही, असे जरांगे म्हणाले.
न्या. शिंदे समितीची बैठक उद्या मंत्रालयातमुंबई : मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राज्यातील ‘मराठा कुणबी’ नोंदी शोधण्याची जबाबदारी असलेल्या न्या. संदीप शिंदे समितीची ६ नोव्हेंबरला मंत्रालयात बैठक होत आहे.
उपोषणकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यूवारंगा फाटा (जि. हिंगोली) : आरक्षण मागणीसाठी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे साखळी उपोषणाला बसलेले प्रकाश मगर (५४) यांचा दुपारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला.