शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

महाराष्ट्रातील गावांना वेगळं होण्यासाठी राष्ट्रवादीची फूस; शिंदे गटाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 4:37 PM

सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करतेय असा आरोप नरेश म्हस्केंनी केला.

मुंबई - राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न पेटला असताना सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकचं समर्थन केले आहे. याठिकाणी गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहोत अशी भूमिका मांडलीय. त्यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. महाराष्ट्रातील गावांना वेगळ करण्यासाठी राष्ट्रवादीनं फूस लावली आहे असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. 

नरेश म्हस्के यांनी म्हटलंय की, राष्ट्रवादी जातीपातीचं राजकारण करून महाराष्ट्रात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतेय. महाराष्ट्रात काही गावं वेगळं होण्याची भाषा करत आहेत. या गावात याआधी समस्या नव्हत्या का? गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे लोक असमर्थ राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता पाऊल उचललं. मात्र या गावांना महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी राष्ट्रवादीकडून फूस लावली जात आहे. राष्ट्रवादी महाराष्ट्र तोडण्याचा डाव आखतेय. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी केला. 

तसेच सध्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष राजकारण करतेय. शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज काय? असं विधान केले होते. त्यात शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? राष्ट्रवादीचे नेते प्रकाश गजभिये यांनी छत्रपतींचा वेष परिधान करून ऐऱ्यागैऱ्यांना मुजरा करत होते. त्यावेळी छत्रपतींचा अपमान झाला नाही का? शाहिस्तेखानाचा देखावा करताना छत्रपती शिवाजी महाराजांना शरद मुखचंद्र लावून राष्ट्रवादीने अधिकृत ट्विट केले होते. छत्रपतींची तुलना पवारांनी केली होती. शरद पवार कधी कोणत्या गडकिल्ल्यावर गेलेत का? सत्तेत गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काय केले? असंही नरेश म्हस्केंनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारलं. 

...तेव्हा छत्रपतींचा अपमान झाला नाही का?छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांनी छत्रपतींचा अपमान केला नाही का? औरंग्याच्या कबरीवर हे फुले वाहतात. त्याचे जतन करतात हा अपमान नाही का? ज्यांनी निष्पाप लोकांच्या घरावर डल्ला मारला. त्या राऊताला अटक झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी कहर म्हणजे एका गुन्हेगाराच्या आईची तुलना जिजाऊंशी केली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला नाही का? टिपू सुलतानच्या नावाने मुंबईत उद्याने करता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं. छत्रपतींची तुलना कुणाचीही होऊ शकत नाही. समाजात तेढ निर्माण करणे, जातीपातीचं राजकारण हेच राष्ट्रवादीचं काम आहे अशा शब्दात म्हस्केंनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस