शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

ओला दुष्काळ जाहीर करण्यास शिंदे-फडणवीस सरकारची टाळाटाळ, नाना पटोलेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 5:13 PM

शेतात तळी निर्माण झाली आहेत, पिकांचे नुकसान तर प्रचंड झालेले आहे, असे असतानाही कृषीमंत्री जे विधान करतात यावरून त्यांना शेती, शेतकरी व शेतीसंदर्भात काहीही माहिती नाही, असा कृषीमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले दुर्भाग्यच आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

मुंबई : राज्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाने खचलेला असताना त्याला मदत देण्याबाबत शिंदे-फडणवीस सरकार फारसे इच्छुक दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतपीके वाया गेली आहेत, हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती. परंतु शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकार तात्काळ मदत देऊन दिवाळी गोड करेल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी हिताच्या केवळ पोकळ गप्पा मारत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसह इतर पक्षांनीही केलेली आहे परंतु या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांचे दुःख, त्याचे अश्रू दिसतच नाहीत. गुजरात हिताला प्राधान्य देणाऱ्या ईडी सरकारने राज्यातील बळीराजाला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय केली आहे, असे नाना पटोले म्हणाले.  

मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या घोषणा या महाविकास आघाडी सरकारने घेतलेलेच निर्णय आहेत, त्यात नवीन काय आहे? ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याच्या निर्णयाची अंमलबाजवणीही मविआ सरकार असताना झाली होती. युद्धपातळीवर पंचनामे करा असे निर्देश देण्याची वेळ सरकारवर का येते? जे कर्मचारी, अधिकारी पंचनामे करण्यात हयगय करतात त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पण शिंदे-फडणवीसांच्या राज्यात शासन व प्रशासन दोन्हीही ढिम्म आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

याचबरोबर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही हे कृषीमंत्र्यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार व असंवेदनशील आहे. मराठवाड्यातील शेताच्या बांधावर कृषीमंत्री गेले तर ओला दुष्काळाची परिस्थिती आहे का नाही हे त्यांना कळेल. शेतजमीन दिसत नाही, बघावे तिथपर्यंत पाणीच पाणी साचले आहे. शेतात तळी निर्माण झाली आहेत, पिकांचे नुकसान तर प्रचंड झालेले आहे, असे असतानाही कृषीमंत्री जे विधान करतात यावरून त्यांना शेती, शेतकरी व शेतीसंदर्भात काहीही माहिती नाही, असा कृषीमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले दुर्भाग्यच आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेFarmerशेतकरी