शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

शिंदे सरकारची सामाजिक वारी, ‘आपला दवाखाना’ आणखी ७०० ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 8:01 AM

Maharashtra Government: राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला.

मुंबई : राज्यात पावसाचे दमदार आगमन झाले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पाडला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांचे कवच, आणखी ७०० ठिकाणी आपला दवाखाना सुरू करणे, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील रकमेत भरघोस वाढ आणि असंघटित कामगारांसाठी महामंडळाची स्थापना आदी सामाजिक व आरोग्यविषयक निर्णयांची वारी काढली.

जनआरोग्य योजनेंतर्गत आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्षी दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले. याचा अनेक गरजू कुटुंबाना लाभ होणार आहे. यापूर्वी केशरी शिधापत्रिका व अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांनाच लाभ  मिळत होता. आता सर्व नागरिकांना आरोग्य संरक्षणाचे कवच असेल. त्याचा फायदा दोन कोटी कुुटुंबांना होईल.  

इतर महत्त्वाचे निर्णयरस्ते अपघातासाठी उपचाराच्या खर्च मर्यादेत ३० हजार रुपयांवरून प्रति रुग्ण प्रती अपघात १ लाख रुपये, अशी वाढ करण्यात आली आहे.राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ उभारले जातील. त्यासाठी २१० कोटी रु. दिले जातील. सध्या मुंबईत असे १५५ दवाखाने आहेत.पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार.     

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस