शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंना धक्का; शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता बदलला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:37 PM

यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. पण आता...

शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना घेऊन, शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले आणि राज्यात भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीचे सरकार आले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाला संपूर्ण राज्यातून जोरदार पाठिंबा मिळतानाही दिसत आहे. मात्र, दुसरी कडे, शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता तर, शिंदे गटाकडून जारी करण्यात आलेल्या एका नियुक्ती पत्रावर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय म्हणून, थेट ठाण्याच्या टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे.

यापूर्वी, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय म्हणून दादर येथील शिवसेना भवनाचा उल्लेख केला जात होता. शिंदे गटाने आता यशवंत जाधव याची मुंबईच्या विभागप्रमुख पदावर नियुक्ती केली आहे. यासंदर्भात, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रावर नव्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचा, म्हणजेच टेंभी नाका येथील आनंदआश्रमचा पत्ता देण्यात आला आहे. तत्पूर्वी, पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यशवंत जाधव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ते शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते.दसरा मेळाव्यात खोडा? -शिवसेनेची शान असलेल्या दसरा मेळाव्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. खरे तर, शिवसेना आणि दसरा मेळावा, हे एक अतूट नाते आहे. या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक येत असतात. मात्र, यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कुणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त आहे.

शिवसेनेतील या दोन्ही गटांकडून अनेक गोष्टींवर दावे केले जात आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यासाठी खुद्द महापालिकेनेच आखडता हात घेतल्याचे समजते. यासंदर्भात खुद्द उद्धव ठाकरे यांनीही महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्याशी संवाद साधल्याचे समजते. मात्र, अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे बोलले जात आहे.  

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना