कोल्हापूर : देशातील टोलनाके बंद करावेत, यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत चक्का जाम आंदोलनाच्या चौथ्या दिवशी रविवारी पुणे-बंगलोर महामार्गावरील सरनोबतवाडीजवळ परराज्यांतून येणारे सुमारे १०० मालवाहतूक ट्रक व वाहने कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अडविली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.१ आॅक्टोबरपासून आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने हे देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्णातील सुमारे ३०० कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, बुधवारी महाराष्ट्र खासगी बसवाहतूक संघटनेने या बेमुदत चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा परिणाम ज्वारी, कडधान्ये या जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्णात तयार होणारी साखर, गूळ-रवे यांची परजिल्ह्णात जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्याचबरोबर नागपूरहून येणारे दगडी कोळसा, स्टील तसेच महाराष्ट्रातील शेजारच्या राज्यांतून येणारी मालवाहतूक बंद झाली आहे. तसेच रोज इचलकरंजीहून ६० ते ७० ट्रक कपड्यांची वाहतूक राजस्थान, गुजरात याठिकाणी होते. पण, सध्या या आंदोलनामुळे ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे. (प्रतिनिधी) मागण्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे निर्णय होत नाही. तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे.- सुभाष रा. जाधव,अध्यक्ष, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनट्रक, टेम्पो, टँकर ही वाहने बंद असल्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर सुमारे ५० टक्के, तर नाक्याबाहेरील पंपांवर ७५ टक्के डिझेल विक्रीवर परिणाम जाणवत आहे. - गजकुमार माणगावे,अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हापेट्रोल-डिझेल असोसिएशन
कोल्हापूरजवळ मालवाहतूक अडविली
By admin | Published: October 05, 2015 3:10 AM