शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
2
मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार! अतिरेक्यांनी गावात केले बॉम्बस्फोट
3
जस्टिन ट्रुडोंच्या अडचणीत वाढ, कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये सामील; भारताने फोटो आणि नाव पाठवले
4
डंका तर BSNL चाच वाजणार! मोबाईलवर ३६००० किमीवरून मेसेज आला, हॅलो इंडिया; नवी स्वदेशी टेक्निक...
5
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
6
"संजय राऊत आणि आमच्यात वाद नाही, पण..." नाना पटोले यांनी स्पष्ट केली भूमिका
7
Rishabh Pant नं साधला मोठा डाव; MS धोनीचा विक्रम मोडित काढत ठरला 'नंबर वन'
8
गर्लफ्रेंडच्या घरी प्रेमीयुगुलाची भेट, पण कुटुंबीयांनी रंगेहाथ पकडलं; बॉयफ्रेंडला पेटीत लपवलं...
9
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
10
OTT साठी Reliance ची मोठी तयारी, JioCinema चं डिस्ने+ हॉटस्टारमध्ये विलीनीकरण होणार
11
रशिया युद्धात उत्तर कोरियाही, पाठविले १२ हजार सैनिक; दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेचा दावा
12
दीड, दोन गुंठ्यात बांधलेले अप्रतिम घर; हॉल, बेडरुमही प्रशस्त... कसे बांधाल, एकदा पाहूनच घ्या ना...
13
खेडमध्ये सर्वपक्षीय विरोधक एकवटले, दिलीप मोहिते-पाटलांविरोधात देणार नवा पर्याय
14
भारताची 'युवासेना' आज पाकिस्तानशी भिडणार; टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? जाणून घ्या सर्वकाही
15
नारायण मूर्तींनी टाटांचा दयाळू उद्योजक म्हणून केला उल्लेख; सांगितला १९९९ चा 'तो' किस्सा
16
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
17
IPO पूर्वीच NSDL नं रचला इतिहास; भारत, जपान, जर्मनीच्या GDP पेक्षा अधिक झाल्या सिक्युरिटीज
18
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
19
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
20
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेतली जे. पी. नड्डा यांची भेट

शेततळ्यांच्या घोषणेचे मराठवाड्यात ‘बाष्पीभवन’

By admin | Published: September 15, 2015 1:47 AM

‘मागेल त्याला शेततळे’ देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेला १५ दिवस उलटल्यानंतरही त्यासंबंधीचे लेखी आदेशच मिळाले नसल्याने दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना

औरंगाबाद : ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेला १५ दिवस उलटल्यानंतरही त्यासंबंधीचे लेखी आदेशच मिळाले नसल्याने दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या व त्यासाठी पैसे कमी न पडू देण्याच्या घोषणेचे एकप्रकारे ‘बाष्पीभवन’ झाल्याचे चित्र आहे.मराठवाड्यात तीन वर्षांत सुमारे दीड लाख शेततळी बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाच्या दौऱ्यात केली होती. मात्र संबंधित आदेश निघण्यासाठी आणखी १०-१५ दिवसांचा कालावधी लागेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यावरून दुष्काळासंबंधी सरकारच्या कामाची गतीही लक्षात येत आहे. आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यात शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. आताही अनेक शेतकरी सरकार दरबारी खेटे मारत आहेत़ शेततळ्यांच्या कामांचे २०१३ पासून नांदेड जिल्ह्याला उद्दिष्टच न दिल्याने बहुतांश शेतकरी योजनेपासून वंचित आहेत. २००७ ते २०१२ कालावधीत ६ हजार ८२६ शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घेतला. परभणीत केवळ जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २२८ शेततळ्यांची कामे सुरू असून १५४ कामे पूर्ण झाली आहेत.हिंगोली जिल्ह्यात जॉबकार्डअभावी अनेकांना शेततळी मिळत नाहीत. (प्रतिनिधी)विहिरींची कामे रखडली रोहयोअंतर्गत मराठवाड्यात हजारो विहिरी मंजूर झाल्या; मात्र त्यातील निम्म्याही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. कामे कासव गतीने सुरू आहेत. बीड जिल्ह्यात साडेसहा हजार विहिरी रखडल्या आहेत. उस्मानाबादमध्ये एक हजाराहून अधिक कामे संथ गतीने सुरू आहेत. नांदेडमध्ये ७ हजार ५०० सिंचन विहिरींची कामे अपूर्णावस्थेतच आहेत़ परभणीत ५३५ सिंचन विहिरींना अजूनही कार्यादेशाची प्रतीक्षा आहे. हिंगोलीत २,२३१ विहिरींना मंजुरी असताना केवळ ८१३ पूर्ण झाल्या आहेत.