नवी दिल्ली : शिर्डी विमानतळाला लवकरच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ आॅक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले.संभाव्य दहशतवादी हल्ले किंवा विमानतळाला घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे संरक्षण दिले जात आहे. सीआयएसएफ, नागरी उड्डयन सुरक्षा विभाग आणि विमानतळाचे आॅपरेटर लवकरच विमानतळाची पाहणी करतील. सीआयएसएफचे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सुरक्षेबाबत विनंती मिळाली असून सुरक्षा कशी पुरवायची यावर विचार सुरू आहे, असे सांगितले. देशातील ५९ विमानतळांना सीआयएसएफकडून सुरक्षा दिली गेलेली आहे.मुंबईपासून शिर्डी २३८ किलोमीटर आहे. सुमारे ६० हजार भाविक रोज शिर्डीला भेट देतात त्यातील किमान १०-१२ टक्के आपल्याकडे वळवायची विमानतळ अधिकाºयांची योजना आहे. हे विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या मालकीचे असून तिनेच ते विकसित केले आहे. त्यासाठी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्याची धावपट्टी २,५०० मीटरची असून एअरबस ए३२० आणि बोइंग ७३७एससारख्या सिंगल नॅरो-बॉडी विमानांना हे विमानतळ हाताळण्यास सक्षम आहे. २,७५० चौरस मीटरची टर्मिनल बिल्डिंग ३०० प्रवाशांना एका वेळेस हाताळू शकते.कमांडोंचा २४ तास पहारा-शिर्डीपासून औरंगाबाद हे जवळचे विमानतळ १२५ किलोमीटरवर आहे. सीआयएसएफने बुधवारी पोर्ट ब्लेअर येथील इस्रोच्या टेलेमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्कच्या सुरक्षेचे काम हाती घेतले आहे. कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी शिर्डी विमानतळावर निमलष्करी दलाचे ६० सशस्त्र कमांडोज २४ तास पहारा देतील.
शिर्डी विमानतळाचे संरक्षण सीआयएसएफकडे, घातपाताच्या शक्यतेचा परिणाम; प्रवासीसंख्या वाढविण्याकडेही कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:33 AM