औरंगाबाद : संस्थानचा दैनंदिन खर्च वगळता निळवंडे धरणासह इतर कोणत्याही कामासाठी शिर्डी संस्थानचा निधी ४ फेब्रुवारीपर्यंत वापरूनये, असा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी दिला.शिर्डी संस्थानच्या निधीच्या अनुषंगाने दाखल याचिकांवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. खंडपीठाने यापूर्वी मागविलेली माहिती सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी केली असता खंडपीठाने ती मान्य करीत या याचिकांची पुढील सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.शिर्डी संस्थानने निळवंडे प्रकल्पासाठी ५०० कोटींचा निधी कोणत्या तरतुदीनुसार आणि कुठल्या अटी व निकषांवर जाहीर केला, अशा प्रकारे अन्य कामांसाठी संस्थानचा निधी वापरण्याची कायदेशीर तरतूद आहे का, अशी विचारणा पुन्हा करुन संस्थानच्या निधीचा नियमबाह्यपणे वापर झाल्यास विश्वस्तांना जबाबदार धरू, असा इशारा खंडपीठाने दिला.स्वच्छता का नाहीसाईबाबांचे भक्त संपूर्ण देशातून आणि परदेशातूनही दर्शनासाठी येतात. देशातील इतर धार्मिक स्थळांप्रमाणे शिर्डीत स्वच्छता का नाही, असाही सवाल न्यायालयाने केला.
शिर्डी संस्थानचा निधी कोणत्याही कामासाठी वापरण्यास कोर्टाची मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 5:57 AM