हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाला शालीनता आणि सुसंस्कार यांची जोड होती. स्वराज्यातील जनतेला औदार्य दाखवतांना त्यांनी कुठेच भेदाभेद केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही सर्वांच्या मनात ताजी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. याच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आज आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.
१) शिवाजी महाराजांना एक दयाळू शासक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी त्यांच्या प्रजेला हा विश्वास दिला होता की, शत्रूंच्या प्रजेसोबत ते चुकीचा व्यवहार करणार नाहीत. तसेच असेही आदेश होते की, जर लढाईत पकडण्यात आलेल्या कोणत्याही महिलेवर अत्याचार होऊ दिला जाणार नाही. त्या महिलांना सन्मानाने घरी परत सोडले जाईल.
२) शिवाजी महाराजांना वीर योद्धा म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी एक नवीन युद्ध शैलीला जन्म दिला होता. या युद्ध शैलीला गनिमी कावा म्हणून ओळखले जाते. त्यांची सेना अशी एकमेव सेना होती, ज्यांनी गनिमी कावा रणनीतिचा सर्वात जास्त वापर केला होता.
३) शिवाजी महाराज एक फार हुशार सैन्य रणनीतिकार होते. ते पहिले भारतीय शासकांमध्ये पहिले असे शासक होते, ज्यांना नौसेनेचं महत्त्व चांगलंच कळालं होतं. त्यासाठीच त्यांनी सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांमध्ये नौसेना स्थापन केली होती. रत्नागिरीमध्ये त्यांनी जहाजांची डागडुजी करण्यासाठी किल्ल्याची निर्मिती केली होती. तसेच त्यांनी सैन्याचं महत्व ओळखून सैन्य २ हजाराहून वाढवून १० हजार केलं होतं.
४) छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज भगवा असला तरी ते कुठल्याही धर्माविरोधात नव्हते. उलट महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. त्यांनी जनतेचे राज्य स्थापन केले होते. त्यात प्रत्येक धर्माला महत्त्व होते. त्यांनी कधी इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना नुकसान पोहोचविले नाही.
५) शिवाजी महाराज हे बालपणी त्यांच्या मित्रांसोबत युद्ध करण्याचा आणि किल्ले जिंकण्याचा खेळ खेळत होते. पुढे ते मोठे झाले आणि वास्तवातही त्यांनी शत्रूंवर आक्रमण करून त्यांचे किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला. त्यांनी पुरंदर आणि तोरणा किल्ला जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं.
६) प्रतापगड आणि रायगड किल्ले जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी घोषित केले. त्यांचा विवाह १४ मे १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला होता.
७) महान योद्धे आणि दयाळू शासक शिवाजी महाराज दीर्घ आजारामुळे ३ एप्रिल १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य सांभाळले.
८) शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. महाराजांचे शिवाजी हे नाव कसे पडले याची एक आख्यायिका आहे. अनेकांना असं वाटतं की भगवान शिव यांच्या नावावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आले. पण तसं नाहीये. शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती. म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले, असे सांगितले जाते.
९) शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला तोरणा होय.गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव पडले तोरणा. गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव ‘प्रचंडगड’ असे ठेवले. वयाच्या १६व्या वर्षी तोरणा सर करुन ज्या शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले.