मुंबई : राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. इंडिया टुडे-अॅक्सिसने घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये काट्याची टक्कर असून ८६ ते ९२ जागा मिळवून शिवसेना पुढे राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, कोणालाच स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने महापौर पद पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पुणे आणि नागपूर महापालिकेत भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, तर ठाण्यात शिवसेना पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून नाशिक महापालिका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आहे. नाशिकमध्ये सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता आहे. तिथे शिवसेना क्रमांक एकवर राहू शकते, तर उल्हासनगरात ओमी कलानी यांच्या साई या पक्षासोबत भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज आहे. सोलापुरात कॉंग्रेसची सत्ता कायम राहू शकते.मुंबई शिवसेना८६-९२भाजपा८०-८८काँग्रेस३०-३४राष्ट्रवादी३-६मनसे५-७इतर २-७जागा : 227पुणे भाजप ७७-८५राष्ट्रवादी६०-६६शिवसेना१०-१३मनसे३-६इतर१-३जागा : 162ठाणे शिवसेना६२-७०भाजपा२६-३३राष्ट्रवादी२९-३४जागा : 130नागपूर भाजपा९९-११०काँग्रेस३५-४१शिवसेना२-४जागा : 145
मुंबईत पुन्हा शिवसेनाच?
By admin | Published: February 22, 2017 5:29 AM