शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवसेना, राष्ट्रवादीत मुख्यमंत्री, गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची शक्यता; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 2:27 PM

गृह मंत्रालयाच्या कारभारावर शिवसेना नाराज; राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक; अदलाबदल होऊ शकते; मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकशा सुरू असताना, ईडीचं धाडसत्र सुरू असताना राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

शिवसेना गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा असताना मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदली केली जाऊ शकते, असं विधान केलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची केली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा मी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऐकली होती, असं मुनगंटीवार म्हणाले.

शिवसेना, मुख्यमंत्री ठाकरे गृह मंत्रालयावर नाराज असल्याचं समजतं. पण त्यांना गृह मंत्रालय का हवंय, हा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. 'महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी, गैरव्यवहार करणाऱ्या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी शिवसेनेला गृहमंत्रिपद नकोय. त्यांना सूडाचं राजकारण करायचंय. भाजपच्या नेत्यांना अडकवायचं आहे. त्यासाठीच त्यांना गृहमंत्रालय हवं आहे,' असा आरोप त्यांनी केला.

विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सूडानं वागत नसतील, तर ती आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी त्यांचं आणि राष्ट्रवादीचं अभिनंदन करतो. वळसे पाटील सूडबुद्धीनं वागत नसतील तर त्यात आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही, असंही मुनगंटीवार पुढे म्हणाले.

भाजप खोटारडा पक्ष- मिटकरीमुनगंटीवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी प्रतिक्रिया दिली आहे. 'भाजप खोटारडा पक्ष आहे. मुनगंटीवार यांच्या विधानाकडे एप्रिल फूल म्हणून बघा,' असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस हा सत्तापिपासू पक्ष नाही. तो गुण भाजपमध्ये आहे. मुनगंटीवारांनी आमची काळजी करू नये, अशी टीका मिटकरींनी केली.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDilip Walse Patilदिलीप वळसे पाटील