भाजपा आक्रमक : 132 जागा द्या; अन्यथा ‘जय महाराष्ट्र’, चेंडू शिवसेनेच्या कोर्टात, चर्चा सुरूच
मुंबई : विधानसभेच्या 132 जागा देणार असाल तरच युती राहील, नाहीतर ‘जय महाराष्ट्र.’ अशी भूमिका भाजपाने घेतल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीचे भवितव्य अजूनही टांगणीला लागले आहे. भाजपाने दिलेला प्रस्ताव मान्य करायचा की, आपले ‘मिशन 15क्’ गुंडाळायचे, याबाबत रात्री उशिरार्पयत शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निर्णय झाला नव्हता.
भाजपाला 132 जागा द्याव्यात, त्यातील 9 जागा लहान मित्र पक्षांना देऊ, तर शिवसेनेने 156 जागा घेऊन त्यातील 9 लहान मित्रंना देऊन स्वत: 147 जागा लढवाव्यात, असा नवा प्रस्ताव भाजपाचे प्रभारी खा. ओम माथूर आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी आ. सुभाष देसाई, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खा. अनिल देसाई या नेत्यांशी झालेल्या चर्चेत दिला. जागावाटपावरून महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांचे संबंध ताणले गेल्यामुळे घटक पक्षांचे नेते अस्वस्थ होते. दोन्ही बाजूंनी चर्चेची कोंडी फुटत नसल्यामुळे सेना-भाजपाशी जवळीक असलेल्या उद्योग आणि इतर क्षेत्रतील काही मान्यवरांनी चर्चा सुरू करण्याचा आग्रह धरल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी माथूर यांच्याशी चर्चा केली. दिवसभराच्या आजच्या घटनाक्रमात भाजपाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक प्रभारी ओम माथूर यांच्या उपस्थितीत आज झाली. तीत स्वबळावर लढण्याचाच बहुतेकांचा मूड होता. 132 जागा मिळत नसतील, तर युती तोडावी, असा एकमुखी सूर होता. कोअर कमिटीतील नेत्यांच्या भावना सेनेर्पयत पोहोचविण्यात आल्या. त्यानंतर माथुर यांच्यासोबत सेनेचे नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत तोडगा न (पान 11 वर)
नव्या पिढीला नकोय युती
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार या नव्या पिढीच्या नेत्यांचा युती करण्यास विरोध असल्याचे सूत्रंनी सांगितले. या नेत्यांना पक्ष विस्तारामध्ये शिवसेना अडचणीची वाटत आहे.
या जागांवर अडले घोडे
शिवसेनेला एकदाही जिंकता आलेल्या नाहीत, अशा 59 आणि भाजपाला आजवर जिंकता आलेल्या नाहीत, अशा 19 जागा आहेत. शिवसेनेकडील 59 जागांपैकी किमान 10 ते 12 जागा भाजपाला हव्या आहेत; तर भाजपाकडील काही मतदारसंघ सेनेला हवे आहेत. तासगाव मतदारसंघ सेनेकडे असताना भाजपाने तिथे अजित घोरपडे यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे.
चर्चा थांबलेली नाही - सुभाष देसाई
शिवसेना-भाजपा युतीची चर्चा थांबलेली नाही. दोन्ही पक्ष मनाचा मोठेपणा दाखवतील याबद्दल शंका नाही. भाजपानेही काही जागा जिंकलेल्या नाहीत. त्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ. 21 तारखेला अंतिम निर्णय होईल आणि राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.
जागावाटप लवकरच - ओम माथूर
महायुती तुटणार ही मीडियामधील चर्चा होती. पक्षाच्या कुठल्याही नेत्याने युती तुटणार असे म्हटले नव्हते. लवकरच महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय होईल.
युती तुटणार नाही - देवेंद्र फडणवीस
शिवसेना-भाजपा युतीमधील चर्चा सकारात्मक असून, युती तोडायची नाही यावर दोन्ही पक्ष ठाम आहेत.
मुख्यमंत्री सेनेचाच - आदित्य ठाकरे
शिवसेना-भाजपा युतीमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. बाळासाहेब ठाकरे व महाजनकाका यांनी केलेली ही युती टिकवण्यावर आम्ही ठाम आहोत. शिवसेनेत कुणालाही अहंकाराची बाधा झालेली नाही. महाराष्ट्राच्या हिताचा जागावाटपाचा फॉम्यरुला काढण्याचे अधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे ओम माथूर यांना दिलेले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ते तर तुम्हाला माहीत आहेच, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आजपासून
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया
मुंबई : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शनिवारी जारी होणार असून, त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू होईल. सर्व 288 मतदारसंघांत येत्या 27 सप्टेंबर्पयत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 29 तारखेला अर्जाची छाननी होईल, तर 1 ऑक्टोबरला उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. सध्या पितृपक्षाचा काळ सुरू आहे. त्यामुळे सोमवारनंतरच अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गती येऊ शकते.
दिल्लीतून फुटली संवादाची कोंडी!
‘युती ठेवायचीच’ ही रूपरेषा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या भेटीतून ठरली तर त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीमधील संवादाची कोंडी अखेर दिल्लीतून फुटली.
- वृत्त/11
कोणाची भूमिका काय?
एकनाथ खडसेपक्षाचा निर्णय मान्य
देवेंद्र फडणवीसयुती तुटणार नाही
विनोद तावडेस्वबळाच्या बाजूचे
सुधीर मुनगंटीवारयुती तोडली पाहिजे
पंकजा मुंडेपक्षाचा निर्णय मान्य
..तर ‘सोन्याहून पिवळे’ : युतीमधील वाद मिटत नसल्याच्या मुद्दय़ावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री
थावरचंद गेहलोत यांनी युती न झाल्यास ‘सोन्याहून
पिवळे’ असल्याची प्रतिक्रिया सटाणा येथे दिली.