सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर थोड्याच वेळात सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यानं शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये जाहिरात आली होती. पण जाहिरातदार शिवसेनेचं धोरण ठरवत नाहीत. शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो, असं ठाकरे म्हणाले. नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.एका बाजूला उद्धव ठाकरे नाणारला विरोध असल्याचं निक्षून सांगत असताना दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्गातले शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. नाणार प्रकल्प स्थानिकांच्या फायद्याचा असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. प्रकल्प पूर्ण करण्याची हीच ती वेळ असे फलकदेखील शिवसैनिकांच्या हातात होते. 'नाणार प्रकल्पाचे फायदे लक्षात आल्यानं आम्ही त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलो आहोत. या प्रकल्पामुळे दीड लाख रोजगार निर्माण होणार आहेत. मुलांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत. स्थलांतर कमी होणार आहे', असं शिवसैनिकांनी सांगितलं. काही सेवाभावी संस्थांनी स्थानिक शिवसैनिकांची दिशाभूल केली. त्यामुळे आधी आमचा प्रकल्पाला विरोध होता, असंदेखील ते पुढे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध असल्याचं स्पष्ट केल्यानंतर थोड्याच वेळात शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्यानं सिंधुदुर्गात संभ्रमाचं वातावरण आहे. नाणारबद्दल शिवसेनेची नेमकी भूमिका काय, शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची भूमिका मान्य नाही का, उद्धव ठाकरेंपर्यंत शिवसैनिकांच्या भावना पोहोचत नाहीत का, अशी चर्चा सिंधुदुर्गमध्ये सुरू आहे.आजच्या महत्त्वाच्या बातम्याशिवसेना बदलली?... 'नाणार'च्या सामनातील जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचं 'रोखठोक' विधानमेट्रो कारशेड आरेमधून रॉयल पार्ममध्ये जाणार? प्रकल्प हलवण्याच्या हालचाली सुरूडोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी ४५ कुटुंबांना घरं रिकामी करण्याचे आदेशChina Coronavirus : धक्कादायक! चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती?
ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 13:13 IST
नाणार प्रकल्पाबद्दल शिवसेनेत संभ्रम; पक्षप्रमुखांचा विरोधी सूर, शिवसैनिकांचा मात्र पाठिंबा
ह्या शिवसेनेचा नेमक्या चल्ला तरी काय? उद्धव ठाकरेंचा नाणारला विरोध; शिवसैनिकांचं मात्र समर्थन
ठळक मुद्देनाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेप्रकल्पाच्या समर्थनासाठी शिवसैनिक उतरले रस्त्यावरनाणारमुळे रोजगार येणार, स्थलांतर थांबणार; शिवसैनिकांचा दावा