शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांचे मोठे संकेत; UPA मध्ये शिवसेना सहभागी होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 9:35 AM

Sanjay Raut On Shiv Sena UPA : आम्ही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मिनी-युपीए चालवत आहोत - संजय राऊत

Sanjay Raut On Shiv Sena UPA : नुकतीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेतली. यादरम्यान, युपीएला (UPA) पुनरुज्जीवीत केलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख यांच्यातील दरी सध्या वाढत असून याच दरम्यान राऊत यांचं वक्तव्य समोर आलंय. दरम्यान, काँग्रेसमध्ये क्षमताही नाही आणि विरोधकांचं नेतृत्व करण्याचं मनही नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.राहुल गांधींसोबत बैठकीत त्यांनी एक पाऊल पुढे टाकण्याचा सल्लाही राऊत यांनी दिला. शिवाय युपीएला पुनरुज्जीवीत करण्याची विनंती करत शिवसेनादेखील युपीएमध्ये सहभागी होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. “आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात एक मिनी युपीए चालवत आहोत. आपल्याला केंद्रीय स्तरावरही अशा प्रकारची व्यवस्था करायला हवी,” असं राऊत म्हणाले. त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंना कल्पना दिली“सर्वांना आमंत्रित करा असं मी राहुल गांधींना सांगितलं. कोणीही स्वत:हून येऊन सहभागी होणार नाही. त्यांच्याकडून भेटीचं निमंत्रण आल्यानंतर आम्ही त्यावर विचार करू. मी ही बाब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्या प्रकारे लोक राहुल गांधीच्या बाबत विचार करतात ते योग्य नाही. राहुल गांधीदेखील चांगला विचार करतात. त्यांच्या पक्षात काही कमतरता आहे. त्यांनी ते मुद्दे सोडवले पाहिजे, असंही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. ज्यावेळी मी राहुल गांधींसोबत चर्चा करण्यास जात होतो तेव्हा याची कल्पना शरद पवार यांना दिली होती आणि बैठकीच्या नंतरही त्यांच्याशी चर्चा केल्याचं राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीShiv Senaशिवसेना