मुंबई- शिवसेनेनं कधीही घोडेबाजार केलेला नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब यांनी केलं आहे. मनसेच्या 6 नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. राजकीय पोटदुखीमुळे भाजपाकडून घोडेबाजाराचा आरोप केला जात असल्याचंही अनिल परब म्हणाले आहेत. वडापाव खाऊन शिवसैनिक निष्ठेनं काम करतो. पैसे असते तर भाजपाची सत्ता उलथवली असती, असंही विधानही अनिल परबांनी केलं आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यानं भाजपाला पोटदुखी झाल्याचंही ते म्हणाले आहेत. काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपाच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपाला याचा थांगपत्ताही लागला नाही.
भाजपा बॅकफुटवरशिवसेनेच्या या खेळीनं भाजपा सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवकअर्चना भालेराव – वॉर्ड 126अश्विनी मतेकर- वॉर्ड 156दिलीप लांडे – वॉर्ड 163संजय तुर्डे – वॉर्ड 166हर्षल मोरे – वॉर्ड 189दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197वॉर्ड क्र. 133चे नगरसेवक परमेश्वर कदम सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.
शिवसेनेकडून घोडेबाजार‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरू झाला आहे. यासंबंधी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहत आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करू,’ अशी प्रतिक्रिया भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढमुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल,’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85कॉंग्रेस – 30राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9मनसे – 7सपा – 6एमआयएम – 2