शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

संजय राठोडांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेला मिळाला मोहरा; उद्धव ठाकरेंची खेळी

By नंदकिशोर नारे | Published: September 30, 2022 2:39 PM

मराठवाडामधील बंजारा नेते रविकांत राठोड यांनी सुद्धा त्यांचे सोबत शिवबंधन बांधले

वाशिम - मानोरा तालुक्यातील बंजारा काशी म्हणून प्रख्यात असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी ३० सप्टेंबर रोजी मुंबई येथील उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर अखेर शिवसेनेत प्रवेश घेतला. अनेक दिवसापासून सुनील महाराज शिवबंधन बांधणार असल्याच्या चर्चेला या प्रवेशाने पूर्णविराम मिळाला.

यावेळी मराठवाडामधील बंजारा नेते रविकांत राठोड यांनी सुद्धा त्यांचे सोबत शिवबंधन बांधले. गेल्या अनेक दिवसंपासून सुनील महाराज हे शिव बंधन बांधणार अश्या बातम्या येत होत्या. महंत सुनील महाराज यांनी शिवबंधन बांधल्यामुळे एक बंजारा समाजात शिवसेनेला नवीन नेता सापडला आहे. मंत्री संजय राठोड याना हा पर्याय असल्याचे बोललं जात आहे. सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशाने लोकसभा व विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याची चर्चा या निमित्ताने  होत आहे.

काय म्हणाले सुनील महाराज?आज पंचमीची यात्रा असून पोहोरादेवीच्या यात्रेचा मुहूर्त साधून मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. संपूर्ण राज्यात १.५ ते २ कोटी बंजारा समाजबांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार आहोत. कारण, शिवसेनाच बंजारा समाजाला न्याय देऊ शकते, सत्तेत वाटा देऊ शकते, असे सुनील महाराज यांनी पक्षप्रवेशावेळी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंनी साधला राठोडांवर निशाणासाधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा..असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला, मी त्यांचं स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. कारण, शिवसेनेनं ज्यांना मोठं केलं, त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण, बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही, त्यामुळे हा समाज आमच्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे