शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शिवसेनेला किंमत मोजावीच लागेल; नितीन गडकरींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 9:18 PM

नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले.

रांची : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरूवात झाली असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. यावेळी नितीन गडकरींनी शिवसेनेला मोठा इशारा दिला आहे. 

नितीन गडकरी यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने घेतली. यावेळी त्यांना झारखंडमध्ये भाजपाला धोका आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी गडकरी यांनी त्यांना भाजपाला धोका असल्याचे वाटत नसल्याचे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील सर्वात चांगले सरकार झारखंडला मिळाले आहे. तसेच झारखंड विकासाच्या दिशेने वेगात जात आहे. जनतेला विकास हवा आहे आणि रघुवर दास यांच्या नेतृत्वात भाजपाची निश्चित विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यानंतर त्यांना महाराष्ट्रातील सहकारी शिवसेनाही विधानसभा निवडणुकीनंतर वेगळी झाल्याचे विचारले असता गडकरींनी अप्रत्यक्ष शिवसेनेला इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना आणि काँग्रेस यांच्या आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. त्याचबरोबर येणाऱ्या काळात शिवसेनेला या आघाडीची किंमत मोजावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे. 

झारखंडची निर्मिती झाल्यावेऴी जेवढे राष्ट्रीय महामार्ग नव्हते त्याच्यापेक्षा जास्त महामार्ग आम्ही दिले आहेत. झारखंडमध्ये रस्त्यांचा मोठा विकास झाला आहे, असा दावाही गडकरी यांनी केला. 

भाजपाचे आमदार फुटणार?भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजपामध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मुळ भाजपाचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपमध्ये आल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस