शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 3:27 AM

ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे.

औरंगाबाद/हिंगोली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी चार सभापतीपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला हरताळ फासत शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतीपदी लागली.

ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. शिवसेनेने ठरवून खेळी केल्यामुळेच शिवसेनेचा महत्त्वाचा एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीमध्ये बांधकाम आणि समाजकल्याण हे दोन सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आणि शिवसेनेकडे महिला व बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य हे दोन सभापती पद देण्यात येणार होते. हे सत्तावाटप ठरले होते. मात्र, उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी करीत तीन सभापतीपदे मिळवली. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी ठरल्याप्रमाणे शिवसेनेने माघार घेतली.

हिंगोलीत महाविकास आघाडीत फूटहिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे नवखे आमदार संतोष बांगर यांनी महाविकास आघाडीला सुरुंग लावत अनुभवी व दिग्गज मानल्या जाणाऱ्या जयप्रकाश दांडेगावकर आणि राजीव सातव यांना राजकीय मात दिली. हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना १५, राष्ट्रवादी १२, काँग्रेस १0, भाजप ११ व अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या एका सदस्याचे पद अनर्ह ठरलेले आहे. महाविकास आघाडीच्या बोलणीनुसार सेनेला अध्यक्ष व महिला बालकल्याण, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष व कृषी तर काँग्रेसला शिक्षण व समाजकल्याण ही पदे ठरली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेस