शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

अनिल परबांचा पाय खोलात! तब्बल २६ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी; निकटवर्तीय गोत्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 6:58 PM

दापोली जमीन खरेदी प्रकरणात अनिल परब अडचणीत; परब यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे

मुंबई: परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागानं परब यांच्याशी संबंधित २६ ठिकाणी आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत आयकर विभागानं छापे टाकले आहेत. दापोली येथील जमीन व्यवहार प्रकरणात आयकर विभागाकडून कारवाई सुरू आहे.

अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सदानंद कदम आयकर विभागाच्या रडारवर आहेत. याशिवाय परब यांच्या जवळच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे पडले आहेत. जमीन खरेदी प्रकरणात आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. दापोलीतील जमीन खरेदी, तिथे बांधण्यात आलेलं रिसॉर्ट, त्यासाठी झालेले व्यवहार याचा तपास आयकर विभागाकडून सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?दापोलीमध्ये २०१७ मध्ये जमीन खरेदीचा व्यवहार झाला. एका व्यक्तीनं १ कोटी रुपये मोजून जमीन खरेदी केली. दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१९ मध्ये जमिनीची नोंदणी करण्यात आली. २०२० मध्ये ही जमीन दुसऱ्या व्यक्तीनं खरेदी केली. या व्यक्तीचं नाव सदानंद कदम आहे. कदम हे परब यांचे निकटवर्तीय असून ते व्यवसायानं केबल ऑपरेटर आहेत. 

२०२० मध्ये सदानंद कदम यांनी १ कोटी १० लाखाला जमीन खरेदी केली. त्यानंतर तिथे रिसॉर्ट बांधण्यात आलं. त्यासाठी ६ कोटी रुपयांचा खर्च आला. ही सगळी रक्कम रोख स्वरुपात खर्च करण्यात आली. रिसॉर्ट बांधताना सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. या व्यवहारात मूल्यांकन कमी दाखवून कमी स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. त्यामुळे सरकारी तिजोरीत कमी महसूल झाला. सरकारची फसवणूक करण्यात आली, असा आयकर विभागाचा आरोप आहे.

'तो' सरकारी अधिकारी कोण?दापोली जमीन खरेदी प्रकरणात एक सरकारी अधिकारीही आयकर विभागाच्या रडारवर आहे. हा अधिकारी परब यांचा निकटवर्तीय असल्याचं समजतं. आयकर विभागानं त्याचं नाव सांगितलेलं नाही. मात्र त्याच्या मालकीचा एक बंगला, फार्महाऊस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाIncome Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालय