मुंबई :शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे (Balasaheb Thackeray Memorial) भूमिपूजन जुन्या महापौर निवासस्थानी पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांची उपस्थिती असणार आहे. मात्र, यावरून आता राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Anil Parab React On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan)
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून शिवसेनेवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण दिले नसल्यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केला आहे. मात्र, यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया देत, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला कुणाला आमंत्रण आहे की नाही, हे मला माहिती नाही. आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार आहोत, असे परब यांनी सांगितले.
“हे पाहिल्यानंतर मी तरी कधीही मास्क विसरणार नाही”; आनंद महिंद्रा
कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही. हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. आम्हीही तो ऑनलाईनच बघणार आहोत. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे. कोण काय बोलतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असा टोला अनिल परब यांनी यावेळी बोलताना लगावला.
बाळासाहेबांचे भव्य स्मारक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे. त्यामुळे आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असे अनिल परब यांनी नमूद केले.