शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Deepali Sayed On MNS : “… मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” दीपाली सय्यद यांचा मनसेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:56 PM

Deepali Sayed On MNS : गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सातत्यानं मनसेवर निशाणा साधत आहेत.

Deepali Sayed On MNS : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) या मनसेवर (MNS) सातत्यानं निशाणा साधत आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. परंतु त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत उत्तर प्रदेशची माफी मागावी आणि नंतरच अयोध्या दौरा करावा असं म्हटलं होतं. यानंतर दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत जावं, असा सल्ला दिला होता. परंतु आता त्यांनी पुन्हा एकदा मनसेवर जोरदार निशाणा साधला आहे.

“पावसाचे कारण देऊन मैदान सोडले. भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले. अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले,” असं म्हणत दीपाली सय्यद यांनी टोला लगावला आहे. यापूर्वीही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, पण त्यांना तिथं येऊ दिलं जात नाही. मी राज ठाकरेंना एवढं सांगेन की, त्यांचं राजकारण हे केवळ २ तालुक्यापुरतंच आहे. पण, शिवसेनेचा आजही अयोध्येत दबदबा आहे. बाबरी मशिद पाडल्याची संपूर्ण जबाबदारी स्वर्गीय बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांचा ते वाक्यही आजही आपल्याला आठवतं,” असे म्हणत दीपाली सय्यद यांनी मनसेला खोचक टोला लगावला.  पुण्यातील सभा पुढे ढकललीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची २१ मेला पुण्यात होणारी सभा रद्द झाली आहे. राज ठाकरे पुण्यातील मनसैनिकांना संबोधित करणार होते. परंतु पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेकडून डेक्कन पोलिसांना सभा रद्द झाल्याचं पत्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आले आहे. येत्या शनिवारी राज ठाकरेंची सभा मुठा नदी पात्रात होणार होती. शनिवारी हवामान विभागाने  पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आल्याचंही समजतंय.

टॅग्स :deepali sayedदीपाली सय्यदMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे