जळगाव - “उद्धव ठाकरे हेच सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांचे काम जनतेला आवडले आहे. त्यामुळे हे सरकार पडणार नाही. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नं पाहावीत,” अशा शब्दांत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निषाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत सामील करण्यात आले होते. हाच धागा पकडत गुलाबराव पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. पाटिल म्हणाले, “गेल्या ९ महिन्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेले काम जनतेला आवडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल जनतेच्या भावना चांगल्या आहेत. यामुळे हे सरकार पडणार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी मुंगेरीलालची सुंदर स्वप्नच पाहावीत.”
यापूर्वी, भजापा नेते नारायण राणे आणि प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचे सरकर फार दिवस टिकणार नाही, ते लवकरच पडेल, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचाही पाटलांनी खरपूस समाचार घेतला. “नारायण राणे आणि प्रवीण दरेकर याआधी कुठे होते? आता कुठे आहेत? ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काय होते हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. भाजपाचे किती आमदार त्यांच्या सोबत राहतील हे दिसून येईलच. सत्ताबदलापेक्षा त्यांनी आपले आमदार सांभाळावेत,” असा इशारा देत, महाविकास आघाडीचे १७० आमदार कायमच सोबत राहणार असल्याचेही पाटील म्हणाले.
पाच वर्षं कुठले; हे सरकार पुढचे वर्षभरही टिकणार नाही -राज्यात भाजपा चांगले सरकार देऊ शकते, महाराष्ट्राच्या इतिहासात घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, भाजपा सरळ मार्गाने सत्तेवर यायला तयार आहे. या सरकारमध्ये अंतर्गत इतके वाद आहेत की सरकार एक वर्ष तरी चालेल का? याची शंका आहे. तिन्ही पक्षांचे एकमेकांसोबत वाद आहेत. कुणाचे कुणासोबत पटत नाही, असेही राणे म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार
रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा