विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक एकनाथ शिंदे आणि अन्य शिवसैनिकांच्या मनधारणीसाठी सूरतला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत पुढील २० आमदारांसह सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
- सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार.
- पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
- औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
- कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
- वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
- अलिबागचे आमदार महेंद्र दळवी
- कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे
- महाडचे आमदार भरतशेठ गोगावले
- आटपाडीचे आमदार अनिल बाबर
- भुदरगडचे आमदार प्रकाश अबिटकर
- पाटणचे आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
- सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
- साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे
- पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील
- मेहकरचे आमदार संजय रायमुलकर
- बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड
- अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर
- पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा
- भिवंडी ग्रामिणचे आमदार शांताराम मोरे
- कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर