सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. दरम्यान, यावर शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर जोरदार निशाणा साधला.
ज्या ठिकाणी मी जातोय तिथे प्रत्येक शिवसैनिक त्या परिस्थितीकडे संकट म्हणून पाहित नाही, तर संधी म्हणून पाहतोय. घाण निघून गेली आता चांगलं काही घडवू शकू. पावसाळ्यापूर्वी मुंबईतली महापालिकेची सवय आहे. रस्त्यांवरील कचरा बाजूला काढतो. नालेसफाई करतो, नद्यातला गाळ काढत असतो. तसंच हे पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई आणि कचरा काढण्याचं काम झालं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. काल परवा व्हिडीओ पाहिला जे जे आमदार इकडून गेलेत त्यांना हाताला मानेला पकडून नेलंय याचं वाईट वाटतंय. तिकडे नेऊन असे हाल होतात. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे का? कोणता दुसरा पक्ष आहे का? किंवा जे पुन्हा येईन पुन्हा येईन बोलतात ते आहेत का? कोणी याच्या मागे असलं तर तरी महाराष्ट्र माफ करणार नाही किंवा झुकणार नाही, असं ही आदित्य ठाकरे म्हणाले.
बंड आणि त्याचं कुरबूर आम्हाला आधीपासून लागली होती. काय नक्की चाललंय हा विचार करण्यासारखं आहे. २० जूनला काही आमदार पळवले आणि काही फसले. गुवाहाटी आणि सूरतला गेल्यावर कैद्यांसारखी परिस्थिती झाली आहे. ठाण्यापासून सुरूवात करायची झाली, आपण मोठे नेते आहोत दादागिरी करत आहोत, दादागिरीनं मनं किंवा लोकांना जिंकू शकत नाही. आज हिंदुत्व, शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांबद्दल, आनदं दिघेंबद्दल बोलताय हिच निष्ठा, हिंमत, हेच शिवसेनेचं रक्त असतं, कुठे कुठून नेलं आहे तर पहिलं गोष्ट तुमचा पक्षप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय याचा आनंद झाला असता, असंही ते म्हणाले.
अनेकांनी मातोश्रीवर येण्यास सुरूवात केली आहे. तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगतात. आज ते आम्ही लढायला तयार आहोत हे सांगत आहेत. हिंमत असती तर त्यांनी बंड केलं नसतं. २० तारखेला मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं होतं कुरबूर कसली करताय ही घ्या वर्षाची चावी, आजपासून तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. पण रडगाणं केलं. पण बंड करायला दुसऱ्या राज्यात गेला. ठाण्यात, मुंबईत महाराष्ट्रात केला असता. निवडणुकीला सामोरे जाण्याची, राजीनामा देण्याची नैतिकचाही निघून गेली. दोन शूरवीर लढा देऊन सूरतेवरून आल्यावर ते बाकीचे कुठे गेले गुवाहाटीला, असंही त्यांनी नमूद केलं.