"... मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करणारे भाजप नेते अमित शाहंना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 12:46 PM2021-08-31T12:46:39+5:302021-08-31T12:47:28+5:30

संजय राऊत यांचा भाजप नेत्यांना रोखठोक सवाल.

shiv sena leader mp sanjay raut criticize bjp coronavirus temple opening government rules amit shah | "... मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करणारे भाजप नेते अमित शाहंना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?"

"... मग मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करणारे भाजप नेते अमित शाहंना हिंदुत्वविरोधी म्हणणार का?"

Next
ठळक मुद्देभाजपचे लोकं इडी कार्यालयात बसलेत का?, संजय राऊत यांचा सवाल.

Sanjay Raut On BJP : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. "महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे, मात्र भाजपचे लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करत आहे. परंतु कोरोनासंदर्भात काळजी घेण्याची नियमावली केंद्र सरकारकडून पाठवम्यात आली आहे. भाजप नेत्यांवर कारवाई झाली तर ते आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. गृहमंत्री अमित शाह यांच्या खात्यानं ही नियमावली जारी केली आहे. आता त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का?" असा रोखठोक सवाल राऊत यांनी केला. 

"भाजपचे लोकं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनं करत आहे. यावर केंद्राकडून काही कारवाई होणार का? आम्ही जर कारवाई केली तर आम्हाला हिंदुत्वविरोधी म्हणाल. अमित शाह यांच्या खात्याकडून ही नियमावली जारी करण्यात आली आहे. ते हिंदुत्वविरोधी आहेत केंग्र सरकारचे नियम पाळत नाहीत, मग तेही हिंदुत्वविरोधी आहेत का?," असे सवाल राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले.

"भाजपचे लोकं इडी कार्यालयात बसलेत का?"
"नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. ते लोकं सांगतात यांना आता ईडी बोलावणार. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं समन्स आहे की खरंच ईडीचं याबाबत संभ्रम आहे. आपण सोशल मीडियावर पाहिलं तर भाजपचे प्रमुख लोकं आहेत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या दहा लोकांची यादी प्रसिद्ध केली. त्या क्रमानुसार यांना बोलावलं जाईल. काल मी म्हणालो की भाजपचे लोकं ईडीच्या कार्यालयात जाऊन बसलेत की ईडीचे लोकं भाजपच्या कार्यालयात येऊन बसलेत," असंही ते म्हणाले.

Web Title: shiv sena leader mp sanjay raut criticize bjp coronavirus temple opening government rules amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.