शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

उद्धव ठाकरे अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनात सहभागी होणार? संजय राऊतांनी दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 6:28 PM

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला.

ठळक मुद्देअयोध्येत बुधवारी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.राऊत म्हणाले, जेथे हा समारंभ होत आहे, तेथे कमित कमी लोकांनी जायला हवे.

मुंबई - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 5 ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार का? यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. मात्र आता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी दिले. राऊत भूमिपूजन कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत पत्रकारांना म्हणाले, पंतप्रधान तेथे जात आहेत, हे अत्यंत महत्वाचे आहे. मुख्यमंत्री केव्हाही तेथे जाऊ शकतात.

अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. तसेच पक्षाने राम मंदिर उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही दिला असल्याचे ते म्हणाले.

राऊत म्हणाले, ''अयोध्या आणि जवळपासच्या भागांत कोरोना व्हायरस चिंतेचा विषय आहे. उत्तर प्रदेशच्या मंत्री कमल रानी वरुण यांचा कोरोनाने मृत्यू झाला असून तीन मंत्री संक्रमित आहेत. माझे असे मत आहे, की जेथे हा समारंभ होत आहे, तेथे कमित कमी लोकांनी जायला हवे. पंतप्रधान तेथे जात आहेत ही मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्री ठाकरे केव्हाही तेथे जाऊ शकतात.''

उद्धव ठाकरे यांना राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले नाही का? असे विचारले असता, राऊत म्हणाले, कुणीही आमंत्रणाची वाट पाहत नाहीय. मंदिराचे पुजारी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. शिवसेना या मुद्द्याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही. अयोध्येतील स्थिती गंभीर आहे आणि आपण तेथे कोण जात आहे, असा प्रश्न विचारत आहात. तेथे शक्य तेवढ्या कमी लोकांनी जायला हवे. आम्ही तेथे नंतर जाऊ.

राऊत म्हणाले, भाजपाचे वयोवृद्ध नेते लाल कृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, यांनी राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली आहे. तेदेखील शक्यतो कोरोनामुळे जात नाहीयत. राऊत म्हणाले, शिवसेनेने राम मंदिर उभारणीचा पाया घातला. जर बाबरी ढाचा पाडला गेला नसता तर मंदिर उभारणे अश्यक्य होते. राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने हे स्वीकारले आहे, की ज्यांनी वादग्रस्त बाबरी ठाचा पाडला, ते शिव सैनिक होते. त्यामुळे, ज्यांनी मंदिर उभारणीचा रस्ता साफ केला, ते आम्हीच होतो. म्हणून मंदिरा उभे राहत आहे. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत आणि आपण पाहीले, की उद्धव ठाकरे आणि आमच्या शिव सेनेने मंदिर उभारणीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

5 ऑगस्टला अयोध्येतच राहणार उमा भारती, भूमिपूजनात सहभागी होणार नाही; सांगितलं हे 'मोठं' कारण

Happy Friendship Day: इस्रायलनं 'हे' खास बॉलीवुड सॉंग ट्विट करत भारताला दिल्या शुभेच्छा 

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानShiv Senaशिवसेना