शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Shiv Sena: बहुतांश आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, खासदार कोणाच्या बाजूने? समोर येतेय अशी माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 9:16 AM

Shiv Sena Crisis: शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या मागे गुवाहाटीला जात असताना पक्षाचे काही खासदारही बंडखोरांच्या गोटात दाखल होत असल्याच्या आणि त्यांना संपर्क केला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने प्रत्येकाशी बोलून घेतलेला हा मागोवा...

शिवसेनेचे एकामागून एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या मागे गुवाहाटीला जात असताना पक्षाचे काही खासदारही बंडखोरांच्या गोटात दाखल होत असल्याच्या आणि त्यांना संपर्क केला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने प्रत्येकाशी बोलून घेतलेला हा मागोवा...

अरविंद सावंत, दक्षिण मुंबई - आता कुठे :  मुंबईत असून, शिवसेना नेत्यांच्या संपर्कात आहेत. 

 श्रीकांत शिंदे, कल्याण - आता कुठे : ठाण्यातील घरीच या विषयावर आपल्याला काहीही भाष्य करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दोघांचाही आजपर्यंतचा राजकीय प्रवास विचारता घेता त्यांचा पाठिंबा एकनाथ शिंदे यांना असू शकतो.

गजानन कीर्तिकर, उत्तर-पश्चिम मुंबई  - आता कुठे : मुंबईतच आहेतगेली अनेक वर्षे स्थानिक लोकाधिकार समितीची धुरा वाहणाऱ्या कीर्तिकर यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगितले.

राहुल शेवाळे, दक्षिण-मध्य मुंबई   - आता कुठे : मुंबईत आहेत.ते आपल्या मतदार संघात शिवसैनिकांसोबत असून, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

राजन विचारे, ठाणे - आता कुठे :  खासदार राजन विचारे ठाण्यातील आपल्या घरीच असून, शिवसेनेतील बंडाबाबत बोलायचे नसल्याने त्यांनी फोन स्वीकारण्याचे टाळले.

राजेंद्र गावित, पालघर - आता कुठे : सध्या पालघर येथील घरीच. मी शिवसेनेसोबतच आहे, असे गावित यांनी स्पष्ट केले. 

विनायक राऊत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग  - आता कुठे :  मुंबईत आहेत.आपण निष्ठावान शिवसैनिक असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोडून जाणार नाही. गेलेले आमदार परत शिवसेनेसोबत येतील, असा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखविला.

 हेमंत गोडसे, नाशिक  - आता कुठे : नाशिकमध्ये आहेत.सध्याचे आमदारांचे आकडे पाहता, गोंधळून जाण्यासारखी परिस्थिती असून, पक्षाचे सारे खासदार मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. 

 धैर्यशील माने, हातकणंगले- आता कुठे : हातकणंगले येथे घरीच आहेत  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सदाशिव लोखंडे, शिर्डी  आता कुठे : मतदारसंघामध्ये दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासोबत मी ठामपणे उभा आहे. ते गेले दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित होते.

भावना गवळी, यवतमाळ-वाशिम आता कुठे : फोन ‘नॉट रिचेबल’.  एकनाथ शिंदे यांनी मांडलेली भूमिका समजून घ्या, असे आवाहन गवळी यांनी बुधवारी मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

प्रतापराव जाधव, बुलडाणा- आता कुठे : नवी दिल्ली येथे आहेत. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत; परंतु, भाजप व शिवसेनेने एकत्र येणे आवश्यक आहे. भाजपसोबत जाणे कधीही चांगले, असे त्यांनी सांगितले.

कृपाल तुमाने, रामटेक  आता कुठे : नवी दिल्ली येथे आहेत.  उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यांपैकी कुणासोबत आहात,  याबाबत उत्तर देण्याचे तुमाने यांनी टाळले.

हेमंत पाटील, हिंगोली - आता कुठे : मुंबईत आहेत. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यामुळे मी कदापिही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी प्रतारणा करू शकत नाही. पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात येणार नाही, असे ते म्हणाले.

संजय जाधव, परभणी  आता कुठे : गुरुवारी मुंबईत होते.  कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने आतापर्यंत दिलेल्या संधीबद्दल समाधानी आहे. त्यामुळे आपण आजन्म शिवसेनेसोबतच राहणार आहोत. दुसरा कोणताही विचार मनामध्ये येणार नाही, असे ते म्हणाले.

ओमराजे निंबाळकर, उस्मानाबाद  - आता कुठे : मुंबईत आहेत. आपले इमान हे कायम ‘मातोश्री’च्या चरणीच आहे. ठाकरे परिवार कोणत्याही प्रसंगात असो आपण आजही त्यांच्याबाजूने आहोत. भविष्यातही ठामपणे राहू, असे ते म्हणाले.  

श्रीरंग बारणे, मावळ - आता कुठे : पिंपरी-चिंचवडमधील घरीच. मोबाइल गुरुवारी काहीवेळ नॉट रिचेबल होता. त्यावरून ते गुवाहाटीला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. सायंकाळी त्यांचा मोबाइल सुरू झाला. मी शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. 

संजय मंडलिक, कोल्हापूर - आता कुठे : कोल्हापुरातच आहेत.  उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी ठाकरे यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून ‘सदाशिवसेना’ कायम तुमच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण