मुंबई: शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्विट शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींना महागात पडलं आहे. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी फोटो ट्विट केला. तो फोटो भगतसिंग यांचाच होता. मात्र त्याखाली चंद्रशेखर आझाद यांचं नाव होतं. ही चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी चतुर्वेदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चतुर्वेदी यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं.भाजपसोबत या, सत्तेत वाटाही घ्या; महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्याला आठवलेंची ऑफरभगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केलं. 'दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद', असं फोटोखाली लिहिलं होतं. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर ट्विट डिलीट केलं.आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद
मृत्यूंजय कुमार यांच्या ट्विटला चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं. अशा अनेक चुका पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकांउटवरदेखील झाल्या आहेत,' अशा शब्दांत चतुर्वेदींनी प्रतिहल्ला केला.