शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

...तेव्हा राणा भाजप खासदारांवर नाराज झाल्या, 'जय श्रीरामच्या घोषणा मंदिरात जाऊन द्या' म्हणाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 3:04 PM

जून २०१९ मध्ये नेमकं काय घडलं होतं? 'जय श्रीराम' म्हणणाऱ्या भाजप खासदारांवर का नाराज झाल्या होत्या नवनीत राणा?

मुंबई: हनुमान चालिसा पठणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. मातोश्रीवर येऊनच दाखवा, असं प्रतिआव्हान शिवसैनिकांनी दिलं. काल संध्याकाळी राणा दाम्पत्याला अटक झाली. कालची रात्र राणा दाम्पत्याला कोठडीत काढावी लागली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणांना २०१९ मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली.

बोगस जातप्रमाणपत्रावर खासदार झालेल्या नवनीत राणा कोणाच्या सांगण्यावरून वातावरण पेटवत आहेत, याची सगळ्यांना कल्पना आहे, असं संजय राऊत म्हणाले. राऊतांचा रोख भाजपकडे होता. राऊत यांनी राणांना तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. त्यावेळी लोकसभेत भाजपच्या खासदारांनी 'जय श्रीराम' घोषणा दिल्या. त्यावर अमरावतीच्या खासदार राणा यांनी आक्षेप घेतला.

संसदेत खासदारकीची शपथ घेत असताना जय श्रीरामच्या घोषणा देण्यात काही अर्थ नाही. ही योग्य जागा नाही. अशा घोषणा देण्यासाठी मंदिरं आहेत. सगळे देव समान आहेत. मात्र एका देवाच्या नावानं घोषणा देणं चुकीचं आहे, असं राणा म्हणाल्या होत्या. १७ जून २०१९ रोजी हा संपूर्ण प्रकार घडला. पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामच्या घोषणांवरून वातावरण तापलं. त्याचे पडसाद संसदेत उमटले होते आणि भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा देत शपथ ग्रहण केली होती.

'त्या' भूमिकेबद्दल राणांचं स्पष्टीकरणतुम्ही संसदेत जय श्रीरामच्या घोषणांना विरोध केला आणि आता हनुमान चालिसा पठणावरून आक्रमक भूमिका घेत आहात, याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न राणांना काल पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर संसद सार्वभौमतेचं प्रतिक आहे. तिथं कोणत्याही धर्माशी निगडीत घोषणाबाजी होऊ नये अशी माझी भूमिका होती. हिंदू धर्माच्या घोषणांना विरोध नव्हता. धार्मिक घोषणा अशा ठिकाणी नकोत, इतकंच मला वाटतं होतं, असं स्पष्टीकरण राणांनी दिलं.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाSanjay Rautसंजय राऊत