२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:28 PM2023-11-07T16:28:07+5:302023-11-07T16:28:34+5:30

आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? असा सवालही तटकरेंनी विचारला.

Shiv Sena-NCP was going to contest the Lok Sabha together in 2009 itself; Sunil Tatkare secret explosion | २००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

२००९ मध्येच शिवसेना-NCP एकत्र लोकसभा लढवणार होती; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

गडचिरोली -  २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकदा आम्हा सर्वांना बोलावण्यात आले आणि लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढविण्याचे ठरविले गेले होते मात्र काही कारणामुळे ते नंतर पुढे घडले नाही असा गौप्यस्फोट अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खास सुनील तटकरे यांनी केला. गडचिरोली येथील पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.

सुनील तटकरे म्हणाले की, २००९ नंतर पुढे २०१४ मध्येही भाजपाला पाठिंबा दिला गेला होता. अशी स्थित्यंतरे अनेक घडली आहेत मग आता आम्ही भाजपासोबत जाऊन काय चूक केली? अजितदादा यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळातील लोकांचे अनेकांनी कौतुक केले. मात्र आमचेच काहीजण आज टीका करत आहेत, काही जणांना नैराश्य आले आहे असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

तसेच यंत्रणांच्या भीतीने आम्ही भाजपसोबत गेलो अशी टीका करत आहेत. स्वतः च्या सावलीला घाबरणाऱ्या लोकांनी आमच्यावर टीका करणे कितपत योग्य आहे? महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक निकाल लागला त्यात दोन नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस राहिली आहे याचा अर्थ अजितदादा यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या राज्यातील महिला भगिनींचा आलेख उंचवायचा असेल तर अजितदादा यांच्याशिवाय पर्याय नाही हेही जनतेच्या मनात आहे. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागा असं आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

दरम्यान, सत्तेत आलो कारण तर जनतेची, त्यांच्या विकासकामांची आम्हाला काळजी आहे या भूमिकेतूनच आपले नेते अजितदादा यांनी निर्णय घेतला मात्र यावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला परंतु हे फार काळ टिकत नाही. मात्र या भावनिक राजकारणाला थारा न देता कामाच्या रुपाने लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अजितदादा पवार काम करत आहेत असं कौतुक महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी केले.

Web Title: Shiv Sena-NCP was going to contest the Lok Sabha together in 2009 itself; Sunil Tatkare secret explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.