ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात गर्जना करणा-या शेट्टींना भाजप नेत्यांनी फटकारले होते. मात्र बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आला आहे.
‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ असा सल्ला राजू शेटटींनी दिला होता, मात्र राज्यातील स्वयंघोषित मित्रपक्ष जेव्हा जन्मही झाला नव्हकता तेव्हापासून शिवसेना 'रालोआ'त आहे अशी आठवण लेखातून करून देण्यात आली आहे. सत्ता गेल्यावर भाजपाची दाणादण उडाली, तेव्हा अनेक पक्ष सोडून गेले, पण तेव्हाही शिवसेना रालोआत होती, प्तिकूळ काळात आम्ही ती टिकवून ठेवली. आम्ही आमचा विचार वा पार्ट्या काहीही बदलले नाही असे सांगत आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी शेट्टींना सुनावले आहे.
आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्याने त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणार्या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वत: राजू शेट्टी तरी ‘भाजप’ सरकारवर खूश आहेत का? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.