शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 01:21 PM2020-01-03T13:21:40+5:302020-01-03T13:27:28+5:30

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली.

Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours.s; Criticism of Nitin Gadkari | शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

शिवसेना भगव्यात नाही, काँग्रेसच्या रंगात रंगलीय; नितीन गडकरींची टीका

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. यावेळी शिवसेनेने भाजपावर शब्द पाळला नाही, खोटे बोलल्याचा आरोप केला होता.शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली.

नागपूर : भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर जिल्हापरिषद निवडणुकीसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपाशी य़ुती तोडून सत्तेत गेलेल्या शिवसेनेवर जहरी टीका केली. 


शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून भाजपाशी फारकत घेत केंद्रातील सत्ता सोडली. केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. यावेळी शिवसेनेने भाजपावर शब्द पाळला नाही, खोटे बोलल्याचा आरोप केला होता. हे सत्तानाट्य दोन महिने रंगले असताना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ते प्रचारसभा घेत होते. 


शिवसेनेने त्यांच्या विचारधारेशी प्रतारणा केली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले. शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असल्याचा घणाघाती आरोप गडकरी यांनी केला आहे.

 


दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी बोचरी टीका केली. 


शिवसेनेकडे एकनाथ खडसेंना द्यायला आहे तरी काय? चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

Web Title: Shiv Sena only pretends to be bhagwa but in reality it is now coloured in Congress' colours.s; Criticism of Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.