शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

“… आणि त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला”

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 9:49 AM

या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत असल्याचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आरोप.

शिवसेना नावाचे अग्निकुंड आजही धगधगताना दिसत आहे. आत्मविश्वासाचे बळ असेल तर जगात तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही, हा शिवसेनाप्रमुखांचा मंत्र प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात मशालीसारखा पेटता आहे. ही मशाल गेल्या पंचावन्न वर्षांत कुणालाच विझवता आली नाही. सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे,’ असे सामनाच्या संपादकीयमधून म्हटले आहे. 

 त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरडय़ात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत, असा आरोपही यातून करण्यात आला आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात?कुणी मंदिरातील मूर्ती चोरली तरी त्या चोरलेल्या मूर्तीचे मंदिर होऊ शकत नाही, ते श्रद्धास्थान ठरू शकत नाही. चोर मंदिरात घुसतात, चोरी करतात ती मूर्ती चोरून विकण्यासाठीच. महाराष्ट्रात नेमके तेच झाले आहे, पण त्याच चोरांचे सरदार सरकारी कवचकुंडलात वावरतात तेव्हा अधःपतनाची सुरुवात वेगाने होते, असे संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.

हे ढोंग नाही तर काय?मोदी हे पंतप्रधान म्हणून चार दिवसांपूर्वी सर्व लवाजमा घेऊन मुंबईस आले. त्यांनी म्हणे अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण केले. त्यांनी मुंबईच्या विकासासाठी काही घोषणा केल्या. ज्या मोदी सरकारने दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रातून सवादोन लाख कोटींचे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवले, त्यांनी मुंबईत येऊन विकासावर भाष्य करावे हे ढोंग नाही तर काय? असा सवालही करण्यात आलाय.

तैलचित्र लावणे ढोंगविधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा व तेज नसल्याने चाळीस बेइमानांच्या ढोंगाशिवाय त्या सोहळय़ात दुसरे काहीच दिसत नाही. मोदींची माणसे म्हणून ज्यांची छाती आज गर्वाने फुगली आहे, त्या फुग्यास टाचणी लावून हवा कमी करण्याचे काम महाराष्ट्राची जनता नक्कीच करणार आहे, असेही संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे