मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यापासून संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बाप-बेटे तुरुंगात जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. यातच आता सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्यांना शिव्या देणार नाही तर काय करणार, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी दिल्लीत जाऊन प्रेझेंटेशन दिले. अशांना शिव्या द्यायच्या नाही तर काय करायचे, असे विचारत संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास काढून पाहा. मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्यांना जोड्याने मारले पाहिजे. विक्रांत गैरव्यवहार प्रकरणी बाप-बेटे तुरुंगात जाणारच, असा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला. संयुक्त महाराष्ट्रातील आमच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना यापेक्षाही भयंकर भाषा वापरली आहे. गेली अनेक दशके मी संपादक आहे, सार्वजनिक जीवनात काम करतो, मात्र, याच व्यक्तीबाबत मी अशी भाषा का वापरतो, अशी विचारणा करत, यासंपूर्ण गोष्टीचे चिंतन त्यांनी करावे, असा सल्ला संजय राऊतांनी केला. ते टीव्ही९च्या मुलाखतीत बोलत होते.
राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी परिस्थिती निर्माण केली जातेय
- गेल्या अडीच वर्षांपासून सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले
- १०५ आमदार येऊनही सत्ता स्थापन करता आली नाही म्हणून भाजपवाले नैराश्येत आहेत.
- यातूनच महाविकास आघाडीचे नियंत्रण नाही आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- राष्ट्रपती राजवट लागू करायला राष्ट्रपती यांच्या घरी कामाला आहेत का, देशात अजूनही संविधान आहे.
- राज्यपालांचे प्रयत्न सुरू असतात अधून-मधून.
- आम्ही निराश झालेलो नाही. महाविकास आघाडी ५ वर्षे पूर्ण करणार
- विक्रांतसाठी ज्यांनी पैसा दिला, त्यांच्या मनात फसवणुकीची भावना आहे
- पैसे घेतले हे त्यांनी कबुल केले आहे. हा ५८ कोटींचा घोटाळा आहे.
- राज्यपाल यांचेच आहे, त्यांनीच माहिती अधिकारात माहिती दिलीय.