Shrikant Shinde News: आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधाराने बांधले गेलो आहोत आणि एकाच विचारधाराने पूर्ण पक्ष चालत आहेत. राज ठाकरेंचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत. म्हणून शिवसेना मनसेचा डीएनए एकच आहे. आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो. मात्र तो वैचारिक विरोध होता. मतभेद होते पण मनभेद नव्हते. विरोधकांना टीका केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही. इतके लोक कार्यकर्ते आपल्याला सोडून का जातात याचे आत्मपरीक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्यांना कुठलेच उत्तर सापडणार नाही, या शब्दांत महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांची काय परिस्थिती होणार ते येत्या ४ तारखेला दिसेल. चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल, असा विश्वास व्यक्त करताना, बाळासाहेब व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मागील दहा वर्षे या लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला मिळाले. मागील दहा वर्षे या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा कल्याण व भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे. घराघरांमध्ये पोहचण्याचा सर्वांचा संकल्प आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
एक चांगले चित्र जनतेसमोर जात आहे
विरोधकांनी टीका करणे, टोमणे मारणे हे काम असेच सुरू ठेवावे. आम्ही आमचे काम करू. या मतदारसंघाची पार्श्वभूमी अशी आहे की, हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला आहे. भाजपा व शिवसेनामहायुतीचे राष्ट्रवादी आरपीआयसह सर्वच पक्ष एकत्र आलेले आहेत. म्हणून एक चांगले चित्र जनतेसमोर जात आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी वडील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि श्रीकांत शिंदे यांच्या आई लता शिंदे उपस्थित होत्या. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले आहे. दोन वेळा श्रीकांत शिंदे निवडून आले आहेत. रॅलीमध्ये सहभागी जनता, कार्यकर्ते, माझा, मुख्यमंत्र्यांचा सर्वांचा आशिर्वाद व शुभेच्छा श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला . ही युती जेव्हा झाली तेव्हा एका विचाराने झाले आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचे काम हे राज ठाकरेंनी केले. आता जेव्हा एका विचाराच्या पक्ष एकत्र आलेत. जसे काम या दोन वर्षात झाले अजून चांगले काम भविष्यामध्ये होत राहील. ही युती तात्पुरती नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढेही राहील, अशी कार्यकर्ता म्हणून असे अपेक्षा व्यक्त करताना, श्रीकांत शिंदे यांनी या विधानातून मनसे-शिवसेना-भाजपा युती ही विधानसभा व महापालिकेतही असेल असे संकेत दिल्याचे सांगितले जात आहे.