“उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:09 PM2023-06-15T15:09:53+5:302023-06-15T15:12:29+5:30

Maharashtra Politics: अजित पवारांनी स्वत:चा सर्व्हे करून घेतला की नाही माहिती नाही, असे सांगत शिवसेना शिंदे गटाकडून पलटवार करण्यात आला.

shiv sena shinde group vijay shivtare replied ncp ajit pawar over criticism on cm eknath shinde | “उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील”

“उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील”

googlenewsNext

Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. जाहिरातींवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप-शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच एका सर्व्हेवरून दावे-प्रतिदावे सुरू आहेत. यातच अजित पवार यांनी केलेल्या टीकेला विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील, असा टोला विजय शिवतारे यांनी लगावला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून एका सर्वेक्षणच्या दाखल्याने दिलेल्या जाहिरातीवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. सर्वेक्षणाच्या हवाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. ७४ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नकोत, असे अजित पवार म्हणाले होते. याला शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिले.

दिशाभूल करण्याचा प्रकार अजित पवार करत आहेत

अजित पवार तोडून-मोडून काहीही बोलत असतात. अजित पवारांनी स्वत:चा सर्व्हे करून घेतला की नाही माहिती नाही. कारण, सर्व्हेनुसार अजित पवारांना फक्त ७ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. दिशाहीन किंवा दिशाभूल करण्याचा प्रकार अजित पवार करत आहेत. तसेच दोन महिन्यआधी बोललो होतो की, पुत्र प्रेमासाठी कमी कुवत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याकडे सेनेची धुरा दिली. राज साहेब बाहेर गेले. उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील नवीन राज ठाकरे एपिसोड हा अजित पवार असतील. सुप्रिया सुळे यांचे कसले आणि काय आव्हान. ज्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता नाही त्या पक्षाचे कसले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, अशी खोचक टीका विजय शिवतारे यांनी केली. 

दरम्यान, सर्व्हेत लोकांना २६ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. तर, २३ टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे वाटतात. म्हणजे दोन्हींचा आकडा ५० टक्क्यांपर्यंत जातो. तर, ५० टक्के लोकांना अन्य मुख्यमंत्री व्हावेत, असा त्याचा अर्थ निघतो. तसेच, २६ टक्क्यांचा विचार केला तर, ७४ टक्के लोकांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको आहे, असाही अर्थ होतो, असे अजित पवार म्हणाले होते. 

 

Web Title: shiv sena shinde group vijay shivtare replied ncp ajit pawar over criticism on cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.