ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- मुंबई महापालिकेत जर युतीची गरज पडली तर शिवसेनेनेच भाजपाला युतीचा प्रस्ताव द्यायला पाहिजे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
मुंबईत आम्हाला थोड्याफार जागा कमी पडू शकतात, त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी शिवसेनेनं आम्हाला युतीचा प्रस्ताव द्यायला हवा, कारण शिवसेनेनेच युती तोडली होती असं एबीपी माझासोबत बोलताना दानवे म्हणाले.
शिवसेना-भाजपामध्ये कोणतेही वैचारिक मतभेद नाहीत असेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईसह राज्यातील सहा महानगरपालिकांमध्ये स्वबळावर भाजपाचाच महापौर बसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यामुळे उद्या निवडणूक निकाल लागल्यावर सेना-भाजपामध्ये कोण कोणाला टाळी देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.