शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Maharashtra Politics: सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 09:37 IST

Maharashtra News: सिल्लोडमधील आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Politics:एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा विविध भागातील ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला राज्यभरातून मोठेच खिंडार पडलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा करत अनेक जिल्ह्यात पदाधिकारी, नेत्यांची नेमणुका केल्या आहेत. याशिवाय शिवसेनेप्रमाणे शिंदे गटाने युवासेनेसाठीही नेमणुका केल्या आहेत. यातच शिंदे गटाच्या युवासेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सभेला परवानगी मिळाली असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मात्र सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींवर आदित्य ठाकरेंनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटाला सुनावले आहे. 

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सिल्लोड येथील महावीर चौकात होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राऊंडवर होणार आहे. झेडपी ग्राऊंड आणि महावीर चौक समोरासमोरच आहे. श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची सभा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची सभा समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे सिल्लोड नगर परिषद सत्तार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी तीनच शब्दांत प्रतिक्रिया देत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, डर अच्छा है

प्रसारमाध्यमांशी बोलताना सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारल्याबाबत आदित्य ठाकरेंना विचारणा करण्यात आली. यावर, डर अच्छा है, अशा तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली. तसेच महिलांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आधी लटके ताई, मग किशोरीताई आणि आता सुषमा ताई, पण आम्ही कोणामुळे दबून राहणार नाही, असे आदित्य यांनी ठामपणे सांगितले आहे. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांची सभा ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भगवान महावीर चौकात होणार आहे. आदित्य ठाकरे यांचीही शिवसंवाद यात्रा आहे. तर श्रीकांत शिंदे यांचीही सभा ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. ही सभा जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे. आदित्य ठाकरे यांना महावीर चौका ऐवजी इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना नगर परिषदेने केली आहे. आंबेडकर चौक आणि प्रियदर्शनी चौकाचे पर्याय आदित्य ठाकरेंना देण्यात आले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना