रत्नागिरी: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्या अटक आणि जामीन नाट्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू केल्यानंतर रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. याबाबत शिवसेनेच्या नेत्यांना विचारले असता, वैयक्तिक टीका कराल, तर जशास तशी रिॲक्शन मिळेल, असा थेट इशारा नारायण राणे यांना दिला आहे. (shiv sena uday samant and vaibhav naik warns bjp narayan rane about uddhav thackeray criticism)
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक”; भाजपचे टीकास्त्र
जनआशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितले असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव ठाकरेंना मानणारे नेते आहोत. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही, याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितले आहे. टीका जरी पुन्हा सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. जशी ॲक्शन तशी रिॲक्शन व्यक्त होत असते. चांगल्या पद्धतीची ॲक्शन झाली तर रिॲक्शनही तशी असेल, असा इशारा शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिला आहे.
“PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला
मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आदर्श देशाने घेतला
अशा पद्धतीची टीका यापूर्वीही झाली. त्यातूनही उद्धव ठाकरे यांनी काम केले. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श देशाने घेतला आहे. त्याचे सगळ्याच पक्षांनी कौतुक केले पाहिजे. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हवे हे जनआशीर्वाद यात्रेत सांगितले पाहिजे. जे काही विधान झाले त्यांनतर त्याची काय प्रतिक्रिया उमटली ते देशाने पाहिले आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
डिसेंबरपर्यंत RBI आणणार स्वतःची क्रिप्टोकरन्सी!; शक्तिकांत दास यांचे संकेत
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका झाली, तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल. त्यावर आम्ही ठाम आहोत. पण आता बघितले तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात येईपर्यंत नाव न घेता टीका सुरू झालीय. पण सिंधुदुर्गात येईपर्यंत टीकाच होणार नाही, याची आम्हाला खात्री आहे, असा चिमटा वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना उद्देशून काढला आहे. टीका झालीच तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही वैभव नाईक यांनी दिला आहे.