मातोश्रीसमोर हजारो शिवसैनिक जमल्याचा दावा केला जात आहे, परंतू मातोश्रीसमोर सव्वा दोनशे आणि राणांच्या घरासमोर १३५ शिवसैनिक जमा आहेत. मी इथे येण्याआधी मोजायला सांगितले होते. जर राणांना पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत बाहेर काढले तर ठीक, नाहीतर मी स्वत: जाईन आणि राणा यांना बाहेर काढेन, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला दिले आहे.
नवनीत राणा यांना मी आता फोन करणार आहे. मदत पाहिजे मी येतो. मी स्वत: राणांच्या घरामध्ये जाणार, मी त्यांनाबाहेर काढणार. तिकडे या कोणी यायचे ते, त्या आधीच पोलिसांनी त्यांना बाहेर काढावे. एक खासदार, एक आमदार दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची जबादारी मुख्यमंत्र्यांची असेल, असेही राणे म्हणाले.
दिशा सालियनवर पार्टीनंतर अत्याचार झाला. तिच्या गाडीत कोण कोण होते. त्याच्या घरी तिच्यावर अत्याचार झाला. तिला इमारतीवरून खाली कोणी टाकले, असा सवालही त्यांनी केला. कंबोज यांच्या गाडीत अॅसिड होते, मग काढायचे होते बाहेर. हजारो शिवसैनिक जमले होते. तलवार सोडली आता गदा आली, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली.
उद्धव ठाकरेंना आधी विचारा वाघ आवडतो की शेळी, गदा आवडते की तलवार मग सांगा. याला नागपूर आंदण दिले आहे. अमरावती बालेकिल्ला होता असे सांगत आहे, मग खासदार कसा पडला. खासदारकीसाठी अर्ज भरताना कागदपत्रे खोटी दिली. मी होते तेव्हा सोबत. बाळासाहेबांनी आदेश दिला होता. मतदार यादीत नाव तरी होते का? अर्जावर हरकत आली. मी सांभाळून घेतले, अशी टीका संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी केली. अखेर पुन्हा ब्रेकिंग न्यूज असेल असे म्हणत राणे यांनी खारला जाणार असल्याचे सांगितले.